किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुठे सभा असली तर चाहते त्यांना साद घालतात ‘देखो देखो ये कौन आया, गुजरात का शेर आहे...!’ हा राजकीय पटलावरचा वाघ असला तरी गुजरातच्या अभयारण्यातील वन्यजीवांत मात्र एकही वाघ नसल्याची शोकांतिका आहे. तथापि, त्या गुजरातला पट्टेदार वाघांचे दर्शन घडवण्याचे वैभव खान्देशातील डोलारखेडा व यावल अभयारण्यातच असल्याची बाब खान्देशच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आहे.रावेर तालुक्यातील निमड्या, जामन्या व सायबुपाडा ही गावे धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासाची गावे असल्याचे वन्यजीव अधिनियमाद्वारे घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.शुक्रवारी वन्यजीव मुख्य वनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक धुळे येथे झाली. या बैठकीला उभय गावातील वनसमितीचे अध्यक्ष व सचिवांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी या बैठकीला शनिवारी रावेरमध्ये आक्षेप नोंदवला. वन्यजीव अधिनियमापेक्षा पेसा कायदा उच्चस्तरीय असल्याने पेसा कायद्यान्वये उभय गावांमधील वनसमितीद्वारे ग्रामसभेचे मत नोंदवून घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.त्या अनुषंगाने खान्देशातील यावल व डोलारखेडा वन्यजीव अभयारण्यात निसर्गत: व्याघ्र पथदर्शी प्रकल्प आहे. त्यातील होणाऱ्या व्याघ्रसंचाराचे संवर्धन व संरक्षण करण्याची समाजमनाची जबाबदारी आहे किंबहुना यावल अभयारण्यात संचार करताना अनेकदा आदिवासी बांधवांना दर्शन घडले आहे. यावल अभयारण्यात असलेल्या लोमड्यांची शिकार होऊन त्या नष्ट झाल्या असून नीलगायींचे वाघांना शिकार म्हणून उपलब्ध असल्याची आदिवासी बांधवांमध्ये चर्चा होती.खान्देशातील या दोन्ही अभयारण्यात संचार करीत असलेल्या पट्टेदार वाघांचे खान्देशवासीयांचे खरे वैभव ठरले आहे. किंबहुना देशावर अधिराज्य करणाºया राजकीय पटलावरील वाघाच्या गुजरात राज्यात दर्शन घडवण्याची भूषणावह बाब खान्देशवाशीयांसाठी ठरली आहे.
गुजरातच्या ‘वाघा’चे देशावर अधिराज्य असले तरी, गुजरातला वाघांचे दर्शन घडवण्याचे वैभव फक्त खान्देशातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 3:45 PM