शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

माजी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 8:55 PM

माजी विद्यार्थी मेळावा : प्रा़ डॉ़ व्ही़एल़माहेश्वरी यांचे मत

जळगाव- माजी विद्यार्थ्यांनी संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, रोजगाराच्या संधी, प्रशिक्षण या सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत असे मत विद्यापीठाच्या लाईफ सायन्सेस प्रशाळेचे माजी संचालक प्रा.डॉ.व्ही.एल.माहेश्वरी यांनी व्यक्त केले़कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेतील १९९२-९४ मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा रौप्यमहोत्सवा शनिवारी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात पार पडला़ त्याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी डॉ.एस.टी.इंगळे, डॉ.सिमा जोशी, प्रा.राजेंद्र देशमुख, डॉ. सुभाष सोनवणे, डॉ.सुरेश टेकी, डॉ. अनिल डोंगरे, प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय पवार मंचावर उपस्थित होते. प्रा.डॉ.सिमा जोशी यांनी गतकाळातील आठवणींना उजाळा देत अध्यापनातील आपले अनुभव कथन केले. डॉ.सुरेश टेकी यांनी कठोर परिश्रम, शिस्तबध्दता आणि सातत्य हे तीन गुण जीवनात यशस्वीतेसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. प्रा.राजेंद्र देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरुन न जाता लढाऊवृत्ती बाळगावी आणि माजी विद्यार्थ्यांचा आदर्श सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगितले.या मेळाव्यास दिलीप बॅर्नजी, दिवाकर पाटील, जयवंत धर्माधिकारी,जळगाव, महेश सोनवणे, मनिष पाटील, मनोज पाटील, नरेश पाटील, परिमलसिंग राजपूत, प्रशांत शर्मा, प्रशांत येवले, पुरुषोत्तम न्याती, राजशेखर कोल्हे, राकेश सोनी, रमाकांत कटीयार, सचिन बापट, संजय महाजन, शौरिन शाह, सुदेश फिरके, सुनील श्रीवास्तव, उमाकांत पावसे, विक्रमसिंग घोरपडे, विवेक पाठक, योगेश चांडक, हितेंद्र शिंदे आदी माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन प्रशांत शर्मा यांनी केले तर आभार उमाकांत पावसे यांनी मानले़

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव