अमळनेर : शहरातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ.निखिल बहुगुणे यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन दिले. दिवसभर सर्व वैद्यकीय सेवा बंद करण्यात केल्या होत्या.यामध्ये आयएमए, होमियोपॅथी असोसिएशन, निमा संघटना व क्लीनिकल लॅबोरेटरी अॅनालिस्ट अँड प्रॅक्टिशनर असोसिएशन तसेच केमिस्ट संघटनेसह शहरातील २०० डॉक्टर सहभागी होते.याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील वडती येथील सासर असलेल्या व अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील माहेर असलेल्या जयश्री कोळी या गर्भवती होत्या. पांढ?्या पेशी वाढल्यामुळे त्यांना डॉ.निखिल बहुगुणे यांच्या दवाखान्यात दाखल केले होते.१७ रोजी रात्री महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्याचा सल्ला डॉ.बहुगुणे यांनी दिला. त्यानंतर महिलेला रुग्णवाहिकेने धुळे येथे रवाना करण्यात आले. दरम्यान, थोडे अंतर गेल्यावर सदर महिलेचा श्वासोच्छ्वास बंद झाला म्हणून नातेवाईकांनी दुस?्या डॉक्टरला दाखवून पाहू, अशी चर्चा केली. याबाबत डॉ.बहुगुणे यांना कळवल्यानंतर त्यांनी परत आणा, आपण पुन्हा उपचार करू म्हणून रुग्ण महिलेसह नातेवाईकांना परत बोलावले. महिलेला पुन्हा तपासल्यांनतर ती मृत झाल्याचे सांगितले. त्यावेळी महिलेच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला. महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला आणि मृत असतानाही डॉक्टरांनी धुळे येथे हलवण्यास सांगितले, असा गैरसमज करून त्यांनी बहुगुणे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांना वाचवण्यासाठी त्यांचे कुटुंब आले असता त्यांनाही महिलेच्या नातेवाईकांनी मारहाण केली. १८ रोजी पहाटे ६ वाजेपर्यंत हा वाद सुरू होता. दवाखान्याबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डॉ.बहुगुणे यांच्या मानेला मार लागल्याने त्यांना धुळे येथे रवाना केले.या घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय व्यवसायाशी निगडित सर्व संस्थांनी भागवत रोड, बसस्थानक, जि.प.विश्रामगृह मार्गे तहसील कचेरीवर मोर्चा काढून तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन दिले. निवेदनावर आयएमए संघटनेचे अध्यक्ष डॉ.नितीन पाटील, सचिव डॉ.संदीप जोशी, होमियोपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत महाजन, सचिव निलेश पाटील, खजिनदार डॉ.राजेश वाडीले, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.रवींद्र जैन, सचिव डॉ.रईस बागवान, खजिनदार डॉ.सचिन पाटील, क्लीनिक लॅबोरेटरी संघटनेचे उदय खैरनार, भटू पाटील, सचिव सुनील पाटील, खजिनदार संजय मुसळे यांच्या सह्या आहेत. मोर्चात डॉ.बी.एस.पाटील , डॉ.राहुल मुठे, डॉ.शरद बाविस्कर, डॉ.सुमित सूर्यवंशी, डॉ.मिलिंद नवसारीकर, डॉ.जितेंद्र पाटील आदी सहभागी होते.दरम्यान, आयएमएचे अध्यक्ष डॉ. नितीन पाटील यांनी ३ दिवसांचा संप मागे घेत असल्याचे पत्रकार पिषदेत सांगितले.