संजय पाटील अमळनेर : जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी बदलल्यानंतर आणि अमळनेरच्या राड्यानंतर भाजपची गटबाजी अधिकच जाणवू लागली असून, प्रचारात कार्यकर्त्यांची उणीवदेखील जाणवू लागली आहे. पुन्हा एकदा जलसंपदा मंत्री गिरीश होऊ शकतात, असे जाणवू लागले आहेतालुक्यात जिल्हाध्यक्ष उदय वाघ समर्थक आणि इतर सर्व गटांचे एकत्र गट असे दोनच गट असून, जळगाव लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी आरएसएसच्या छुप्या गटाने स्मिता वाघ आणि नंतर ए.टी. पाटील असे प्राधान्य दिले होते. स्मिता वाघ यांना उमेदवारी देताना गिरीश महाजन यांचा स्पष्ट विरोध होता असे बोलले जाते आणि ए.टी. पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील यांनी कडाडून विरोध केल्यानंतर महाजन यांना आयती संधी चालून आली आणि उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचे परिणामदेखील जाणवले. अमळनेरच्या बूथ मेळाव्यात उदय वाघ व समर्थकांनी माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील यांनी स्मिता वाघ यांच्यावर केलेल्या टीकेचा बदला काढला. सभेत केलेल्या बदनामीकारक वृत्ताचे सभेतच उत्तर देण्यात आले.एकंदरीत, दोन्ही सभेतील प्रकारांबाबत वरिष्ठ नेत्यांनी मात्र त्यांनी तटस्थ भूमिका घेतल्याचे त्यांच्या वागण्यावरून असे दिसून आले. उमेदवार बदलताच महाराणा प्रताप चौकातील भाजप प्रचार कार्यालय अॅड.व्ही.आर. पाटील यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यामुळे पूर्वीच्या कार्यालयात स्मिता वाघ यांच्या नावाचे फलक कोपऱ्यात ठेवण्यात आले. गाद्या, खुर्च्या टेबल तसेच पडून असून, त्यावर धूळ जमली आहे. उदय वाघ आणि स्मिता वाघ प्रचार करणार असल्याचे म्हणत आहेत परंतु बूथ प्रमुख आणि यादी प्रमुख त्यांच्या ताब्यात आहेत आणि ते तळागाळातील कार्यकर्ते मात्र प्रचारास निघायला तयार नाहीत. तिकडे खडसे गटातील डॉ.बी.एस. पाटील आणि माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनीही प्रचारास नकार दिला आहे. घटनेच्या अनुषंगाने कारवाईचे निमित्त दाखवून खडसे समर्थक प्रचारातून बाजूला होत असल्याचे जाणवत आहे तर पत्नीबद्दल अपशब्द वापरले म्हणून पती या नात्याने वाघ यांचे रक्त खवळणे साहजिक आहे असे काही नेते म्हणत आहेत.तर बी.एस.पाटील यांनी उमेदवारी मिळाली नाही तेव्हा एकनाथराव खडसे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी करून भाजपचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना पराभूत करण्यात यशस्वी झाले होते व काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्याबाबत किती गांभिर्याने घ्यायचे याचीही चर्चा सुरू आहे.भाजप उमेदवाराचा प्रचार करणार असून, लवकरच सुरुवात करेल व २३ नंतर इतर मतदारसंघातदेखील प्रचाराला जाणार आहे. -उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजपविविध नेत्यांशी चर्चा करून जर तुम्हाला भाजप उमेदवार निवडून आणायचा असेल तर उदय वाघ यांच्यावर तत्काळ कारवाई करा, असे सांगितले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मी प्रचारात सहभागी होणार नाही.-सुभाष चौधरी, माजी नगराध्यक्ष, अमळनेरजोपर्यंत उदय वाघ यांच्यावर पक्ष कारवाई करत नाही तोपर्यंत प्रचारात उतरणार नाही. वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत.-डॉ.बी.एस.पाटील, माजी आमदार, अमळनेरमाझा आतेभाऊ वारला आहे. मी तिकडे आहे. आधी फिरलो. विधी आटोपल्यानंतर प्रचार करेल. -लालचंद सैनानी, माजी शहराध्यक्ष, अमळनेरमाझा मित्रपरिवार आणि मी स्वतंत्र प्रचार करेल. भाजपसोबत प्रचार करणार नाही. रावेर मतदारसंघातदेखील प्रचार करण्यासाठी जात आहे. -शिरीष चौधरी, भाजप सहयोगी आमदार.
अमळनेर भाजपतील गटबाजीमुळे जाणवतेय प्रचारात उणीव...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 1:15 PM