ऑनलाईन लोकमत
अमळनेर/चोपडा/पारोळा,दि.4- शेतक:यांनी पुकारलेल्या संपाचा अमळनेर, चोपडा येथील बाजारपेठेवर परिणाम झाला नाही. मात्र पारोळ्यात बाजारपेठेत फारशी आवक नव्हती.
अमळनेर येथे रविवार असुनही बाजारपेठेत नेहमीप्रमाणेच गर्दी होती. विक्रेत्यांनी भाजी विकण्यासाठी आणली होती. ग्राहकांची संख्याही चांगली होती. भाज्यांचे दर आहे तेच होते. त्यामुळे संपाचा येथे फारसा फरक पडलेला नाही.
चोपडा येथे शेतकरी संपाच्या काळात येथे दोनवेळा रास्तारोको आंदोलन झाले. असे असतांना रविवारी आठवडे बाजारात शेतक:यांनी भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. आवक चांगली झाल्याने, बाजारही सुरळीत सुरू होता. चोपडा येथील कृउबा आवारात भरलेल्या गुरांचा बाजारातही तेजी होती.
पारोळा येथे आज आठवडे बाजार होता. नेहमीपेक्षा भाज्यांची आवक कमी प्रमाणात झालेली होती. भाज्यांचे दरही कडाडले होते. भाजी 80 ते 100 रूपये किलो दराने विकली जात होती. ग्राहकांची संख्याही बाजारपेठेत कमी होती. कृउबात गुरांचा बाजार भरलेला होता. याठिकाणी शेतक:यांऐवजी व्यापा:यांनीच बैल विक्रीस आणले होते. गुरांच्या बाजारातही गर्दी कमीच होती.