अमळनेर, जि.जळगाव : ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ या उक्तीची प्रचिती येथे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्यानिमित्ताने आली आहे. निराधारांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.येथील निराधार व वृद्ध महिलांना संजय गांधी, श्रावण बाळ व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नेहमीच शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास होत होता. त्यामुळे अशा रंजल्या गांजल्यांसाठी पुष्पलता पाटील यांनी त्यांचे पती माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या सहकार्याने ‘राजभवन’ या त्यांच्या निवासस्थानी मदत केंद्र सुरू केले आहे. त्यात स्वखर्चाने शंकर खैरनार यांची त्यांनी नियुक्ती केली आहे.या स्तुत्य उपक्रमांतर्गत काही महिलांना लाभ मिळवून देण्यात आला आहे. त्यांची प्रकरणे मंजूर झाल्याचे पत्र त्यांना देण्यात आले. यावेळी पाटील दाम्पत्यासह ज्येष्ठ नेते रामभाऊ संदानशिव, देखरेख संघाचे चेअरमन विक्रांत पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, फयाजखान पठाण, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.
अमळनेर नगराध्यक्षांनी सुरू केली स्वखर्चाने रंजल्या गांजल्यांची सहाय्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 6:04 PM
‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ या उक्तीची प्रचिती येथे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्यानिमित्ताने आली आहे. निराधारांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
ठळक मुद्देनिराधारांना मदत मिळवून देण्यासाठी घेतला पुढाकारअनेकांना प्रकरण करून दिली मंजूर