अमळनेर : तालुक्यात २८ रोजी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत तर ७९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाने त्रिशतक पूर्ण केले असून एकूण रुग्णांची संख्या ३१४ झाली आहे बाजारातील गर्दी आणि दुकांदारांचा निष्काळजीपणा कोरोना वाढीस कारणीभूत ठरला आहे.पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील १५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात वरनेश्वर नगर मधील २ जण , वाडी चौक १ ,जोशींपुरा ६ जण, पैलाड १ मारवड २ आणि शिरूड येथील ३ जण असे पॉझिटिव्ह आले आहेत. तर नव्या रुग्णांमध्ये भालेरावनगर आणि ख्वाजा नगर मधील प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आले आहेत तर एकूण ७९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ७३ अहवाल प्रतीक्षेत आहेत.२२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ६३ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाग्रस्तांमध्ये डॉक्टर , दुकानदार व्यापारी यांचा समावेश असल्याने त्याला कारणीभूत ते स्वत: ठरले आहेत. व्यावसायिक , नागरीक यांच्याकडून नियम पाळले जात नसल्याने तालुक्यात चहूबाजूने रुग्ण आढळत आहेत.
अमळनेरला कोरोनाग्रस्तांचे त्रिशतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 8:16 PM