अमळनेर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या जलतरण तलावाचे अमळनेरकरांचे स्वप्न पूर्ण होणार असून पालिकेला २ कोटी ५६ लाखांच्या जलतरण तलावास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
अनेक वर्षांपासून अमळनेरला जलतरण तलाव व्हावा, अशी मागणी तरुणांनी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार क्रीडा व युवक कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे जलतरण तलावाचा प्रस्ताव आमदार अनिल पाटील यांनी सादर केला होता व त्यानंतर पाठपुरावा सुरू होता. कोरोनाची परिस्थिती असल्याने राज्य सरकारदेखील कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याने विकासकामे ठप्प पडली होती. मात्र हळूहळू कामे वेग धरत असून क्रीडा क्षेत्रातील तरुणांना याचा लाभ घेता येणार आहे. या माध्यमातून अनेकांना पोहण्यासाठी संधी प्राप्त होणार आहे.
क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक साहाय्य करणे ही क्रीडा धोरणातील एक महत्त्वाची शिफारस आहे. राज्यातील शैक्षणिक संस्था, महत्त्वाच्या खासगी क्लब संस्था, क्रीडा मंडळे, प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था यामधून दर्जेदार क्रीडा सुविधा निर्मिती त्याद्वारे खेळाडूंच्या कामगिरीत वाढ करून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्मिती करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट असून या योजनेअंतर्गत क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी व त्याप्रमाणे त्याच प्रमाणे क्रीडा साहित्यासाठी आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणे या योजनेअंतर्गत क्रीडा क्रीडा सुविधेच्या निर्मिती आवश्यक असून त्यासाठी क्रीडा साहित्यासाठी ७५ टक्के खर्च उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. आलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. त्यात अमळनेर नगरपालिकेसाठी जलतरण तलाव २ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यात राज्य शासनाचा ९० टक्के खर्च आहे.