अमळनेर,दि.21- नगरपालिका विविध कर वसूल करते. त्यापैकी वृक्ष कर आहे. दरवर्षी वृक्षकराच्या माध्यमातून पालिकेला जवळपास आठ लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र किती वृक्ष लावले आणि किती जगवले यांची अमळनेर पालिकेकडे नोंदच नसल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करून राज्य शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्धिष्ट ठेवले होते. राज्यभर ही मोहीम राबविण्यात आल होती. महानगर पासून गावपातळी पयर्ंत असणा:या शासकीय कार्यालयांना, शाळांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्टय़ दिले होते. त्यानुसार वृक्ष वाटप करण्यात आले होते.
या उपक्रमांतर्गत अमळनेर नगर परिषदेला गेल्यावर्षी 825 वृक्ष लागवडीचे उद्दिष्टय़ होते. मात्र प्रत्यक्षात 658 रोपे नगर पालिकेला मिळाली होती. मिळालेली वृक्ष नगरपरिषदेने नगराध्यक्षा, मुख्याधिकारी आणि नगरसेवकांच्या हस्ते वेगवेगळ्या प्रभागातील खुल्या भूखंडावर आणि माजी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून विकसित केलेल्या नवीन कॉलनी भागातील उद्यानांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली होती. मात्र जे वृक्ष लागवड केले होते, ते जगावे यासाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा प्रय} केला गेला नाही. तसेच लावलेल्या वृक्षापैकी किती वृक्ष जगले याची नोंद सुद्धा नगरपालिका प्रशासनाकडे नाही. 2016-17 च्या अर्थसंकल्पात मध्ये वृक्षकराच्या माध्यमातून नऊ लक्ष रुपये जमा होणार असल्याचा अंदाज होता. त्यापैकी 8 लक्ष 29 हजार, 872 रुपये वृक्षकर म्हणून वसूल करण्यात आला आहे. मात्र या पैशात नगर परिषदेने किती व कोणत्या ठिकाणी वृक्ष लावले याची देखील नोंद नाही. वृक्ष कर म्हणून वसूल करण्यात आलेला पैसा दुस:याच बाबीवर खर्च करण्यात आल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सूत्रांनी सांगितले.
(वार्ताहर)