ऑनलाईन लोकमत अमळनेर, जि.जळगाव, दि. 18 : येथील बालाजीपुरा भागातील महिलांनी सोमवारी सकाळी मूलभूत सुविधा मिळण्यासाठी नगरपालिकेवर मोर्चा आणला होता. या वेळी महिलांनी प्रशासनाधिकारी संजय चौधरी यांना निवेदन दिले. प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास आंदोलन करण्याचा निर्धार याप्रसंगी महिलांनी बोलून दाखविला. दरम्यान, प्रशासनाधिकारी चौधरी यांनी बालाजीपुरा भागात स्वच्छतेसाठी तत्काळ आरोग्य कर्मचारी पाठवत दैनंदिन स्वच्छतेचे आश्वासन महिलांना या वेळी दिले. महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या भागात 25 वर्षापासून पक्के रस्ते नाहीत, गटारी बांधल्या नाहीत, ज्या बांधल्या आहेत त्या तुंबल्या आहेत, त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. पावसाचे पाणी गटारीतून घरात शिरते डास प्रतिबंधासाठी फवारणी केली जात नाही यासह विविध मागण्यांचे निवेदन संजय चौधरी यांना देत महिलांनी यावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. या वेळी लक्ष्मीबाई महाजन, आशा महाजन, आशा ठाकरे, शोभा ठाकरे, मीना शेकटकर, रेखा जाधव , सरला लोहार आदी होत्या.
अमळनेर पालिकेवर महिलांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 1:28 AM
उपाययोजना करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
ठळक मुद्देसमस्या वारंवार मांडून लक्ष देत नसल्याची व्यथाप्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास आंदोलनाचा निर्धार25 वर्षापासून पक्के रस्ते, सुविधा नाहीत