शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

अमळनेरला सुरू झाला सावित्रीच्या लेकींचा धमाकेदार जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 9:22 PM

पालिका व अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे शुक्रवारपासून सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर 'सावित्रीबाईंच्या लेकींचा महिला महोत्सवास' छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रारंभ झाला.

ठळक मुद्देस्त्री भ्रूणहत्या विरोधात सर्वसंमतीने झाला ठरावपालिका व अमळनेर महिला मंच ट्रस्टचा उपक्रम

अमळनेर, जि.जळगाव : पालिका व अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे शुक्रवारपासून सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर तृतीय वर्षीय 'सावित्रीबाईंच्या लेकींचा महिला महोत्सवास' छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रारंभ झाला.माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, डॉ.अनिल शिंदे, नगरसेवक प्रवीण पाठक, निशांत अग्रवाल, विक्रांत पाटील, संजय चौधरी, प्रमुख अतिथी बेटी बचाव आंदोलनाच्या राष्ट्रीय संघटक डॉ.सुधा कांकरिया, झेप उद्योगिनीच्या संचालिका पौर्णिमा शिरीषकर, स्वयंशक्तीच्या संचालिका दीपाली चांडक, ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ.अपर्णा मुठे, उपाध्यक्ष तिलोत्तमा पाटील, कांचन शाह, सरोज भावे व सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीत विविध घोषवाक्ये लिहिलेले छोटे फलक गॅसच्या फुग्याच्या सहाय्याने हवेत सोडून महोत्सव व त्यानिमित्ताने लागलेल्या ७० स्टॉल्सचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड.मीनाक्षी राठोड यांनी सादर केलेले 'घुमर... घुमर...' गाण्यावरील नृत्य व नेहा देशपांडे आणि विवेक नाईक संचालित नादब्रह्म हे महिलांचे ढोल पथक लक्षवेधी ठरले.व्यासपीठावर प्रमुख अतिथींसह ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नयना कुलकर्णी यांनी साधना राधना या गाण्यावर केलेल्या नृत्याने चांगली दाद मिळविली. येथील पहिल्या महिला प्राचार्या डॉ.ज्योती राणे यांचे प्रताप महाविद्यालयास ए प्लस नॅक दर्जा मिळविण्यासाठीचे योगदान तसेच त्यांची नॅक समिती सदस्यपदी झालेली निवड याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बालिका दिनानिमित्त डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या बालिका व त्यांच्या मातांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.प्रास्ताविक करताना डॉ.मुठे यांना महिलांवरील अत्याचार व स्त्री भ्रूण हत्येच्या विषयावर अश्रू अनावर झाले .डॉ.कांकरिया म्हणाल्या की, स्त्री जगली, शिकली व स्वत:च्या पायावर उभी राहिली तर ती दारिद्र्य निर्र्मूलनाची पहिली पायरी ठरेल. गेल्या वर्षी दीड कोटी स्त्री भ्रूण हत्या झाल्या. जगात सर्वात जास्त स्त्री भ्रूण हत्या भारतात होतात. त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. हा एक प्रकारचा मुका दुष्काळ आहे. आईचे उदर तीर्थक्षेत्र असते, मात्र त्यास सर्रास स्मशानभूमी करणे सुरू आहे.डॉ.कांकरिया यांनी सर्वांना स्त्री भ्रूण हत्येविरोधात शपथ दिली. ट्रस्टतर्फे डॉ.मुठे यांनी स्त्री भ्रूण हत्येविरोधात मांडलेल्या ठरावास सर्वसंमतीने मंजुरी देण्यात आली.दीपाली चांडक व पौर्णिमा शिरीषकर यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या सहाय्याने उपस्थित महिलांशी संवाद साधला. गरिबी परिस्थितीची नसते तर विचारांची असते, असे सांगून त्यांनी महिलांना स्थानिक पातळीसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी उद्योजिका होण्यासाठीचे मार्गदर्शन केले.मोहिनी खाडिलकर व भारती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकAmalnerअमळनेर