अमळनेर (जि,जळगाव) : सप्तशृंगी गड घाटात झालेल्या बस अपघातात अमळनेर तालुक्यातील मुडी येथील आशाबाई राजेंद्र पाटील ( ५०) या ठार झाल्या. तर याच गावातील १२ महिलां जखमी झाले आहेत. घटनेचे वृत्त कळताच मंत्री अनिल पाटील यांनी प्रशासनाला आदेश देऊन ते मुंबई येथून घटनास्थळी रवाना झाले आहेत.
बस अपघातात जखमींमध्ये प्रमिलाबाई गुलाबराव बडगुजर (वय ६५), सुशीलाबाई सोनू बडगुजर (वय २७) , वत्सलाबाई साहेबराव पाटील (वय ६५) , सुशीलाबाई बबन नजान (वय ६४) ,विमलबाई अक्रत भोई (वय ५९) , प्रतिभा संजय भोई (वय ४५), जिजाबाई साहेबराव पाटील (वय ६५), संगीता मांगुलाल भोई ( ५६), रत्नाबाई (पूर्ण नाव माहीत नाही) , सुरेखाबाई हिरालाल बडगुजर (वय ४३) , संगीताबाई बाबूलाल भोई (वय ६०), भागीरथाबाई माधवराव पाटील (वय ५२) ह्या जखमी झाल्या आहेत. मंत्री अनिल पाटील यांनी मुंबईहून घटनास्थळी धाव घेतली असून प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व महिला मुडी ता. अमळनेर येथून देवदर्शनाला पंढरपूर ,जेजुरी ,शनिशिंगणापूर ,शिर्डी मार्गे गडावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला गेल्या होत्या.