अमळनेर : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी शहरातील शेकडो दात्यांनी वस्तूरुपी मदतीचा हात हिला आहे. अवघ्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक सामग्री जमा झाली आहे. हे साहित्य प्रत्यक्ष पूरग्रस्तांना देण्यासाठी स्वयंसेवक ट्रक घेऊन सांगलीकडे रवाना झाले.अमळनेर तालुका गिरिभ्रमण ग्रुप, अमळनेर सायकलिस्ट ग्रुप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, फोटोग्राफर असोसिएशन एन.यू.जे.एमतर्फे सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याची मदत देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळाला. रविवारी मोठ्या प्रमाणात मदत गोळा झाली. कार्यकर्त्यांनी शहरात फिरून हे साहित्य जमा केले. यात जीवनावश्यक वस्तूंसह कपडे, चादरी व शालींचा समावेश आहे. ही वस्तूरूपी मदत ११ रोजी रात्री ट्रकद्वारे पूरग्रस्त भागात रवाना झाली आहे.सांगली जिल्ह्यातील एकी पूरग्रस्त गावात अजून कोणतीही मदत पोहोचलेली नाही. तेथील नागरिकांना या जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार आहेत. सोबत गेलेले स्वयंसेवक इतर मदतकार्यदेखील करणार आहेत. जमा झालेल्या वस्तूंमध्ये धान्य (तांदूळ, डाळ, साखर), कोरडी चटणी, ग्लुकोज बिस्किटे, एनर्जी चॉकलेट, लवकर वाळणारे आंघोळीचे रुमाल आदींचा समावेश आहे. त्यात तांदूळ १ टन, डाळ दोन क्विंटल, अंघोळीचे साबण, कपड्याचे साबण, खोबरेल तेल, बिस्किट, मॅगी, कपडे, औषधी, चादर, बेडशीट, ज्वारी, बाजरी, गहू पीठ, कंगवे, चटणी, मीठ, कांदे यासह अनेक वस्तूंचा समावेश आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून शेकडो हात पुढे आल्याने मोठी मदत जमा झाली आहे. या वस्तू गोळा करणे, पॅकिंग करणे, गाडी भरणे, आदी कार्य स्वयंस्फूर्तीने कार्यकर्त्यांनी केले आहे.यामध्ये डॉ.चंद्रकांत पाटील, संदीप पाटील, महेंद्र पाटील, सागर अहिरे, जितेंद्र शिरसाळे, राजेंद्र पाटील, हरीश देशमुख, उमेश धनराळे, जयवंत ढवळे, विकासराव जोशी, प्रकाश ताडे, संकल्प वैद्य, पंडित नाईक, हितेश शहा, ओम पाटील, प्रदीप कंखरे, समाधान पाटील, तन्मय कुलकर्णी, प्रसाद मांडे, राकेश पवार, ईश्वर देशमुख, बंटी पाटील, गणेश भावसार आदींचा समावेश आहे.