अमळनेर : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक सबंध ठेवणाºया २८ वर्षीय आरोपीस जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने ८ रोजी १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.आरोपी दीपक आत्माराम पाटील (रा.पैलाड) याने पीडित मुलीच्या मैत्रीणीच्या सोबतीने पीडितेला अमळनेरहून चाळीसगाव येथे वहिनीच्या घरी नेले. त्याठिकाणी आरोपीने तिला ३ दिवस डांबून ठेवले त्यानंतर ९ सप्टेंबर २०१६ रोजी तिला परत अमळनेर घेऊन आला. त्यानंतर आरोपीने पुन्हा तिला २२ सप्टेंबर पर्यंत डांबून ठेवत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बळजबरी शारीरिक सबंध ठेवले. ज्या खोलीत तिला डांबून ठेवले होते त्या बंद खोलीची चावी तिला सापडल्याने तिने त्याच इमारतीत राहणाºया भाडेकरू महिलेच्या सहाय्याने कुलूप उघडून घर गाठले. घरी परत आल्यानंतर तिने संपूर्ण घटनेचे कथन पालकाजवळ केल्याने तिच्या फिर्यादी वरून आरोपी दीपक पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.खटल्यात एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यात वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय प्रमाणपत्र,पंच व मुलीचा आतेभाऊ यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरवत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश विक्रम आव्हाड यांनी आरोपीस कलम ३७६ साठी १० वर्ष सक्तमजुरी ५ हजार रुपये दंड, कलम ६३६ खाली ५ वर्ष कारावास व ३ हजार रुपये दंड, कलम ३६६ अ खाली ५ वर्ष कारावास ५ हजार दंड, कलम ३४३ खाली २ वर्ष कारावास व ३ हजार दंड व बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ८ नुसार ३ वर्ष कारावास व ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील शशिकांत पाटील यांनी काम पाहिले.
लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या अमळनेरच्या आरोपीस १० वर्षे सक्त मजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 9:36 PM
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक सबंध ठेवणाºया २८ वर्षीय आरोपीस जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने ८ रोजी १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.
ठळक मुद्देजिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाललग्नाचे आमिष दाखवित केला अत्याचारभाडेकरू महिलेच्या मदतीने केली होती पीडितेने सुटका