अमळनेर : जिल्ह्यातील देहविक्री करणाऱ्या भगिनींना समाजाचा विरोध पत्करून संघटित करून त्यांच्या २२ मुलींचे विवाह करून सन्मानाने जीवन प्रवाहात आणण्याचे काम अमळनेर येथील आधार संस्थेच्या भारती पाटील व रेणु प्रसाद या नवदुर्गांनी केले आहे.शिवाय एचआयव्ही संसर्गित गरोदर मातांचा संसर्ग त्यांच्या बालकांपर्यंत पोहचू नये म्हणून त्यांची तपासणी करून काळजी घेऊन सुमारे ७०० ते ८०० बालकांना संसर्गापासून यशस्वीरीत्या वाचवण्यात यश आले आहे.एचआयव्ही संसर्गित सर्व पुरुष व महिला आणि बालके यांना विहान प्रकल्पाद्वारे समुपदेशन मदत व मार्गदर्शन करून समाजातील विविध दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने एचआयव्ही ही संसर्गित बालकांना आहार पुरवला जातो.यासोबत कौटुंबिक हिंसाचार, महिलांना कायदेविषयक माहितीची असलेली गरज व मोडणारी कुटुंबे पाहून कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र आणि बाल सहाय्य कक्षाची स्थापना केली व २ हजार कुटुंबांची घडी बसवली. देहविक्री करणाºया महिला भारतात जन्मल्या असून त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड नसल्याने त्यांची नागरिक म्हणून ओळख नव्हती. त्यांना समाजाच्या प्रवाहात आणून सर्व शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम आधार संस्थेच्या पदाधिकारी भारती पाटील व रेणु प्रसाद यांनी केले आहे.
अमळनेरच्या नवदुर्गांनी २२ मुलींचे संसार केले उभे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 3:28 PM
जिल्ह्यातील देहविक्री करणाऱ्या भगिनींना समाजाचा विरोध पत्करून संघटित करून त्यांच्या २२ मुलींचे विवाह करून सन्मानाने जीवन प्रवाहात आणण्याचे काम अमळनेर येथील आधार संस्थेच्या भारती पाटील व रेणु प्रसाद या नवदुर्गांनी केले आहे.
ठळक मुद्देएचआयव्ही संसर्गापासून ८०० बालकांचीही घेतली काळजीविविध दानशूर व्यक्तींचे घेतले सहकार्यकौटुंबिक हिंसाचार, महिलांना कायदेविषयक माहितीचे मार्गदर्शन