अमळनेर, जि.जळगाव : राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान (रुसा) अंतर्गत प्रताप महाविद्यालयाला अडीच कोटींचे अनुदान प्राप्त झाले असून ‘प्रताप’चे रुप खऱ्या अर्थाने पालटणार आहे. महाविद्यालयातून आता पदवीधर, पदव्युत्तर नव्हे तर संशोधक, उद्योजक बाहेर निघणार आहे सानेगुरुजी अभ्यास केंद्र सुरू करण्यात येणार आहेस्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांना गुणवत्ता वर्धित करण्यासाठी रुसा संस्थेतर्फे अनुदान देण्यात येते. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव प्रताप महाविद्यालय यासाठी पात्र झाले असून, एकूण पाच कोटींचा निधी मिळणार आहे. त्यापैकी अडीच कोटी रुपये १० रोजी प्राप्त झाले आहे. ४५० लाखांपैकी ५० लाख रुपये विद्यार्थ्यांची उद्योजकता वर्धन होण्यासाठी, महाविद्यालयातून उद्योजक बाहेर निघण्यासाठी इंक्युबेशन सेंटरसाठी खर्च करावे लागणार आहेत. १३५ लाख रुपये हे इमारती बांधकाम, दुरुस्ती, संगणक, हार्डवेअर, साहित्य खरेदीसाठी वापरता येणार आहेत. ३१५ लाख रुपये सेमिनार, कॉन्फरणस ,प्रशिक्षण ,संशोधन , तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी अनुदान , फेलोशिप , शिष्यवृत्तीसाठी खर्च करण्याची मुभा मिळणार आहे यात विद्यार्थ्यांना अनुभव सिद्ध समृद्ध करण्यासाठी स्थळ भेटी , शिष्यवृत्ती, सहली, पर्यावरण सुरक्षा संवर्धन, नवीन कौशल्य विकास आदींवर खर्च करता येणार आहे.प्रत्येक विभागाला स्मार्ट क्लास रूम करण्यात येणार आहे. सानेगुरुजी राहत असलेल्या खोलीत सानेगुरुजींच्या नावे अभ्यास केंद्र सुरू करून त्यात गुरुजींचे साहित्य, लिखाण गोळा करून विद्यार्थी वाचकांसाठी उपलब्ध करून गुरुजींच्या जीवनावरील चित्रफीत तयार करून दररोज भेटी देणाऱ्यांना ती दाखवली जाईल. प्रताप शेठजींच्या नावे शिष्यवृत्ती सुरू करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा प्रकारातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे.खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक व कर्मचारी यांच्या सहकार्याने ‘प्रताप’चे रूप पालटणार आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे नागरिक या महाविद्यालयातून बाहेर निघणार आहेत.- डॉ.ज्योती राणे, प्राचार्या, प्रताप महाविद्यालय, अमळनेर
अमळनेरच्या ‘प्रताप’चे रूप पालटणार, ‘रुसा’तर्फे अडीच कोटींचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 1:11 AM
राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान (रुसा) अंतर्गत प्रताप महाविद्यालयाला अडीच कोटींचे अनुदान प्राप्त झाले असून ‘प्रताप’चे रुप खऱ्या अर्थाने पालटणार आहे.
ठळक मुद्देसंशोधक, उद्योजक बाहेर पडणारसानेगुरुजी अभ्यास केंद्र सुरू होणार