अमळनेर : येथील समर्थ नगरमधील पद्मावती अपार्टमेंटमधील दीपाली गुणवंत पवार या महिलेने २५ रोजी जैतपिर येथे दुचाकी उभी करून तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दीपाली पवार ही महिला एमएच-१९-बीएच-६७६९ क्रमांकाची दुचाकी घेऊन आली आणि तलावाच्या काठी उभी करून सरळ तलावात उडी घेतली. योगेश धनराज बागुल यांनी ही घटना पाहिली व पोलीस पाटील गोविंदा लोटन पाटील यांना कळवली. त्यांनी संतोष कोळी व महेंद्र पाटील यांच्या मदतीने महिलेला बाहेर काढले. मारवड पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल भास्कर चव्हाण करीत आहेत.
अमळनेरच्या महिलेची तलावात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 11:01 PM