अमळनेर : अमळनेर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नं. २ वर बºयाच दिवसापासून अस्वच्छता पसरली होती. याची दखल घेत रोज अपडाऊन करणाºया प्रवाशांच्या ट्रॅव्हलर्स युथ क्लबने १५ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास प्लेटफॉर्मची साफसफाई केली. प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर झाली होती अस्वच्छता अमळनेर स्थानकावर नव्यानेच प्लॅटफॉर्म नं. २ ची उभारणी करण्यात आली आहे. मात्र याठिकाणी स्वच्छतेची काळजी घेण्यात आलेली नाही. ठिकठिकाणी कचरा साचलेला होता शिवाय ज्याठिकाणी बसण्यासाठी बाक तयार करण्यात आले आहेत नेमके त्या बाकांच्या खालीच प्रवाशांनी थुंकलेले होते. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरायची. याचा त्रास मात्र रोज अपडाऊन करणाºया प्रवाशांना होत होता. यांनी केली स्वच्छता याची दखल जळगावला रोज अपडाऊन करणारे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डी.एस.पोटोळे, जि.प. वरिष्ठ सहाय्यक भुपेंद्र(भटू)बाविस्कर, गटविकास अधिकारी एस.टी.सोनवणे, तिकिट तपासणीस राधारमण राय, कमलेश्वर आमोदेकर, मिलिंद सैंदाणे, नितीन विंचूरकर, पंकज फालक, संदिप निकम, प्रशांत ब्रम्हे, सुहास सराफ, भरतसिंग परदेशी, सुदर्शन पाटील, रवींद्र मोरे, मनोज पाटील आदींनी घेत ट्रॅव्हलर्स युथ क्लबची स्थापना केली आणि त्याद्वारे संपूर्ण प्लॅटफॉर्मची साफसफाई करण्यात आली. यावेळी स्टेशन अधीक्षक एस.के.रॉय यांचे सहकार्य लाभले.
रेल्वेने दररोज ये-जा करणाºया प्रवाशांनी अमळनेर स्टेशन केले चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:47 PM
स्तुत्य : अधिकारीही सरसावले
ठळक मुद्देप्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर झाली होती अस्वच्छतास्वच्छतेची काळजी घेण्यात आलेली नाहीसंपूर्ण प्लॅटफॉर्मची साफसफाई करण्यात आली.