आॅनलाईन लोकमतपारोळा,दि.१५ : नगरपालिकेतील गटनेते मंगेश सुधाकर तांबे यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत वडिलांच्या राजकीय वारसा जपला आहे. त्यातूनच शहरवासियांसाठी त्यांनी तत्काळ उपचारासाठी रुग्णवाहिका व पाण्याची आवश्यकता पाहत नागरिकांना घरपोच पाणी पुरवठा व्हावा यासाठी पाण्याच्या टँकर लोकार्पण करण्यात आले.माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिका व पाणी टँकरचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी गट नेते मंगेश तांबे, बापू मिस्त्री, रमेश भगवती, श्रीकांत शिंपी, प्रा.आर.बी.पाटील, केशव क्षत्रिय, डॉ.अनिल गुजराती, अरुण वाणी, दिलीप शिरोडकर, राजू कासार, राहुल नांदेडकर, संजय कासार, भिकन महाजन, गणेश पाठक उपस्थित होते.चिमणराव पाटील यांनी मंगेश तांबे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. शहरात पाणी पुरवठा आठ दिवस आड होतो. टंचाईग्रस्त भागात या टँकरने पाणी पुरवठा होईल तसेच रुग्णांना तात्काळ घरपोच सेवा या रुग्णवाहिका द्वारे होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या वेळी मंगेश तांबे यांनी वडिलांच्या कार्याला उजाळा आणि शहरवासियांची सेवा करण्याची संधी मिळाली असे सांगितले. या वेळी संजय गोसावी, पी.आर.वाणी, गणेश बारी, मोहित शिंदे यांनी परिश्रम घेतले.
पारोळ्यात रुग्णवाहिका व पाण्याच्या टँकरचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 4:27 PM
पारोळ्यातील मंगेश तांबे यांनी जोपासली सामाजिक बांधीलकी
ठळक मुद्देनगरपालिका गटनेते मंगेश तांबे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकीटंचाईग्रस्त भागात होणार पाण्याचा पुरवठा.माजी आमदार चिमणराव पाटील यांनी केले कार्याचे कौतुक