अमळनेर : शहरातील प्रताप मीलच्या कंपाऊंडमध्ये दि. 30 सप्टेंबरच्या मध्यरात्री सहा बंद घरांचा कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यानी सोन्याचांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना भरवस्तीत घडल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दसरा आणि त्याला लागून सलग तीन दिवसांची सुटी आल्याने बहुसंख्य नोकरदार आपल्या मूळ गावी गेलेले होते. याच संधीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी आपला ‘प्रताप’ दाखवत प्रताप कॉलनीतील सहा घरे फोडली. धर्मेंद्र बन्सीलाल जैन यांच्या घरातून चार हजार रोख , 1 चांदीचा ग्लास , सुभाष पाटील यांच्या घरातील पंधरा हजार रुपये, 5 गॅ्रम सोने, तसेच चांदीच्या वस्तू, भीमराव पाटील यांच्या घरातून 4 हजार रोख ,व 20हजार रुपये किंमतीच्या साडय़ा, अमृत पाटील यांच्या घरातून पाच हजार रोख , 7 ग्रॅम सोने, राजेंद्र मनोरे यांच्या घरातून 1 ग्रॅमची सोन्याची अंगठी , चांदीचा ग्लास, तसेच वंदना बाळकृष्ण खैरनार यांच्या घरातून दोन हजार रोख चोरटय़ांनी लंपास केले. या प्रकरणी अतुल सुभाष शिंदे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भादंवि 457,454,380 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक विकास वाघ करीत आहेत
अमळनेरात चोरटय़ांचे सिमोल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 6:36 PM
दस:यासह लागोपाठ आलेल्या सुटय़ांची संधी साधून चोरटय़ांनी आपल्या गावी गेलेल्या अमळनेरातील प्रताप मील कंपाऊंडमधील रहिवाशांच्या बंद सहा घरांना लक्ष्य करीत रोख रकमेसह सोन्या- चांदीचे दागिने लंपास केल्याने या रहिवाशांना दसरा ‘हसरा’ न वाटता ‘दुखरा’ वाटला आहे.
ठळक मुद्दे एकाच रात्रीतून चोरांनी मारला दागिने आणि रोख रकमेवर डल्लाप्रताप कॉलनीतील सहा बंद घरांचे कडी कोयंडे तोडून दाखवला प्रतापदसरा सण मोठा परंतु देऊन गेला ‘तोटा’ चा रहिवाशांना अनुभव