आॅनलाईन लोकमत अमळनेर,दि.१४ - शेतकºयांना सरसकट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, शेतीमालास हमीभाव मिळावा, शेतकरी, शेतमजूर यांना १० हजार रूपये पेन्शन मिळावे, पाडळसे धरणाचे काम त्वरीत पूर्ण करावे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य किसान सभेतर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता धुळे रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कर्जमाफीच्या आॅनलाईन अर्जाची होळी केली. अर्धातासानंतर आंदोलन शांततेत पार पडले.रास्तारोको आंदोलनासाठी सकाळी १० वाजेपासून या परिसरात शेतकरी जमा होऊ लागले होते. सकाळी ११.०५ मिनीटांनी आंदोलनास सुरवात झाली. शेतकºयांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने, रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. शासनाचे शेतकºयाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप अनेकांनी केला.कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याचे शेतकºयांनी सांगितले. त्यानंतर शेतकºयांनी या आॅनलाईन अर्जाचीच होळी केली.नायब तहसीलदार आर.आर.ढोले यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात किसान सभा सचिव ज्ञानेश्वर पाटील, सहसचिव नरेंद्र पाटील, कॉ.लक्ष्मण शिंदे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकूळ पाटील, मनोहर निकम, उमेश पाटील, नरसिंग पाटील, विमलबाई शिंदे, अरूण बाबुराव देशमुख, जयवंत शिसोदे, पुरूषोत्तम पाटील यांच्यासह जवळपास १०० शेतकरी सहभागी झाले होते. धानोरा (ता.चोपडा)येथेही शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा यांच्यावतीने जळगाव-यावल चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्धातास हे आंदोलन सुरू होते.
अमळनेरात कर्जमुक्तीसाठी रास्तारोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 4:39 PM
शेतकरी व शेतमजुरांना १० हजार रुपये पेन्शन मिळावे या मागणीचे दिले प्रशासनाला निवेदन
ठळक मुद्देकर्जमाफीच्या आॅनलाईन अर्जाची होळी केली.धुळे रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्तारोको आंदोलन शासनाचे शेतकºयाकडे दुर्लक्ष झाल्याचा मान्यवरांनी केला आरोप