अमळनेर : तालुक्यातील हिंगोणे खु येथे बोरी नदी पात्रातून अवैद्य वाळू खनिज वाहतूक करणाऱ्या सुमारे १२ वाहनांवर आणि वाहने पळविण्यासाठी मदत करणाºया इतर ११ अशा एकूण २३ जणांवर तहसीलदार व तलाठी यांनी अमळनेर पोलिसात चोरीचा व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली आहे असून उर्वरित फरार आहेत.हिंगोणे खुर्द ता. अमळनेर येथील बोरी नदी पात्रात रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास तहसीलदार ज्योती देवरे, शहर तलाठी पुरुषोत्तम पाटील, तलाठी प्रथमेश पिंगळे (नगाव), मनोहर भावसार, (मंगरूळ), योगेश पाटील (पातोंडा), आशिष पार्थे (मांडळ), स्वप्निल कुलकर्णी (गांधली), विठ्ठल पाटील (शिरसाळे) यांना १२ टेम्पो अवैध रित्या रेती वाहतूक करतांना आढळून आले. त्यात सुरेश बागडे (रा. मरीमाता नगर, अमळनेर) यांची एमएच ०२/ वायए ६८८५, राहिमखा युसुबखा (रा. कसाली मोहल्ला) एमएच १९/ ३१७६, मुख्तार शेख बाशीर (रा.झामी चौक) एमएच १९/ ७८६९, रविंद्र भगवान भोई (रा. मरीमाता नगर) एमएच ०३/३१२७, वसीमखा फिरोजखा (रा कसाली मोहल्ला) एमएच ०३ /सीई १३७,मूकद्दर अली जोहर अली (रा कसाली मोहल्ला) एमएच १९/ ६०५९, सतीश वाल्मिक पाटील (रा. शिरूड) यांच्या मालकीची विना नंबर पांढºया रंगाची टेम्पो आदी वाहनांवर कारवाई करून अमळनेर पोलिसात जमा केले आहेत. कारवाई सुरू असतांना हिंगोणे ता. अमळनेर शिवारातून खंडेश्वर महादेव मंदिर मार्गे पसार झालेला नसीबखा पठाण (रा. कसाली मोहल्ला) एमएच ०४/जीसी ३५६८ ,सादिक पठाण (रा. कसाली मोहल्ला अमळनेर) एमएच ०६/ इ ०५२६, शेख सलमान खा हमीद खा (एमएच ०३/ एएच ९८९,जावेद खा इस्माईल खा याचे विना नंबर वाहन आदी वाहनांमध्ये सुमारे पाव ब्रास वाळू वाहतूक सुरू होती. सदर वाहने मिळून सुमारे १० हजार४७६ रुपये किमतीची ३ ब्रास वाळू तसेच प्रत्येक वाहन ४० हजार रुपये किमतीचे असा एकुण २ लाख ९० हजाराचा ऐवज मिळून आल्याने तो पंचनामा करून जमा करीत असतांना वरील आरोपींनी पोलीस स्थानकात वाहने नेण्यास नकार देऊन महसूल कर्मचाऱ्यांसोबत वाद घालत सरकारी कामात अडथळा आणला. शिरूड येथील तलाठी वाल्मिक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सुरेश बागडे, रहीम खान, मुख्तार शेख, रविंद्र भोई, योगेश कोळी, रोहीत बागडे, सतीश पाटील, रविंद्र कोळी, वासीम पठाण, सद्दाम शेख युनूस, मोहम्मद मेवाती, महेंद्र थोरात, शोएब खॉन, शाहरुख शेख, भुºया खाटीक याना अटक केली आहे.वाळू चोर समर्थकांविरूद्धही गुन्हावाळू चोरणाºया आरोपींचे समर्थक रोहित सुरेश बागडे, सद्दाम शेख युसूफ शेख, युसूफ खा मेवाती, भुºया उर्फ शफी , योगेश गोकुळ कोळी, रविंद्र कैलाश कोळी, महेंद्र संजू थोरात , शाहरुख खा इब्राहिम पठाण, गोटू काळू बागडे रा. अमळनेर यांनी महसूल कर्मचाºयांशी हुज्जत घातली.
अमळनेरात वाळू चोरी करणारी १२ वाहने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 9:04 PM