अमळनेर, जि.जळगाव : सैन्यदलात यूनोच्या माध्यमातून भारताचे शांतीदूत म्हणून दक्षिण आफ्रिकेत दीड वर्षापासून कार्यरत असलेले खान्देशचे सुपुत्र अमित श्यामकांत पारोळेकर यांची अरूणाचल प्रदेशात सैन्यदलात कर्नल पदावर नियुक्ती झाली आहे. १ फेब्रुवारी रोजी ते रूजू होत आहेत. याबद्दल अहिर सुवर्णकार व सोनार सराफ असोशियनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आलाप्रा.डॉ.ए.जी.सराफ यांनी मनोगत व्यक्त केले. अमित पारोळेकर हे गुजराथमधील बडोद्याचे असून, अमळनेरला त्यांचे आजोळ आहे. सराफ असोशियनचे मुकुंद विसपुते यांचे ते भाचे आहेत.एकोणाविसाव्या वर्षी ते सैन्यदलात भरती झाले. १६ वर्षाच्या सेवेत आज कर्नल पदावर पोहचले आहेत. यापूर्वी जम्मू-काश्मीरला पूंछ येथे लेप्टनंट कर्नल पदावर होते. त्यांची कर्नल म्हणून निवड झाली आहे. आजोळी आल्यानंतर त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी सुवर्णकार समाजातर्फे अध्यक्ष राजेंद्र पोतदार, उपाध्यक्ष मोहन भामरे, विश्वस्त जितेंद्र भामरे, नीलेश देवपूरकर, बाळासाहेब दुसाने यांनी, तर सोनार सराफ असोशियनच्या वतीने प्रा.डॉ.ए.जी.सराफ, राजू वर्मा मदन अहिरराव यांनी सत्कार केला.यावेळी त्यांनी प्रसाद महाराज यांचेदेखील आशिर्वाद घेतले. यावेळी मिलिंंद भामरे, राजेंद्र विसपुते, हरीश्चंद्र सराफ, भूषण निकुंभ, प्रभाकर पिंगळे, जयेश वानखडे, संजय, कपिल, हर्षल, आदिती व अथर्व विसपुते, वैशाली विसपते तसेच अमित पारोळेकर यांच्या आई चित्राबाई, पत्नी श्वेतांबरी पारोळकर उपस्थित होते.
अमित पारोळेकर यांची अरुणाचल प्रदेशात सैन्यात कर्नल पदावर नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 10:31 PM
सैन्यदलात यूनोच्या माध्यमातून भारताचे शांतीदूत म्हणून दक्षिण आफ्रिकेत दीड वर्षापासून कार्यरत असलेले खान्देशचे सुपुत्र अमित श्यामकांत पारोळेकर यांची अरूणाचल प्रदेशात सैन्यदलात कर्नल पदावर नियुक्ती झाली आहे.
ठळक मुद्देअमळनेर येथे सत्कार१ फेब्रुवारी रोजी स्वीकारणार सूत्रे