जिजाबराव वाघचाळीसगाव, जि. जळगाव - ‘सुर्वण लायन आॅस्कर प्राईज गोज टू स्नॅपटीविटी’. फ्रान्सच्या जगप्रसिद्ध कान्स फेस्टीवल मध्ये हे ध्वनी निनादले आणि टाळ्यांचा कडकडाटात तिरंगाही डौलाने फडकला. थेट कान्स फेस्टीवल गाजविणारी स्नॅपटीविटी कंपनी ही अमित पाटे यांची. पाटे चाळीसगावचे सुपुत्र असून नासा गर्ल स्वीटी पाटे यांचे बंधू आहेत. हे फेस्टीवल नुकतेच झाले. अमित पाटे यांनी दोन सुवर्ण लायन आॅस्कर पुरस्कारांवर आपली नाममुद्र्रा कोरली.अमित पाटे यांची इंग्लड मध्ये स्नॅपटीविटी कंपनी आहे. याच कंपनीला कान्स फेस्टिवल २०१८ मध्ये आर्टिफिसिअल इंटेलिजन्सवर आधारीत क्रीडा तंत्रज्ञानासाठी मोबाईल श्रेणीकरीता एकच नाही तर तब्बल दोन सुवर्ण लायन आॅस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.एक नाही तर दोन सुवर्ण कान्स लायन पुरस्कार मिळाल्याचा अभिमान आहे. आम्ही अत्यंत आंनदी आणि उत्साहीत झालो आहोत. आमच्या रोमांचकारी संशोधन प्रवासातील हा एक महान मैलाचा दगड असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती करून मानव कल्याणासाठी जनतेपर्यंत सर्जनशील आणि मजेदार मार्गाने पोहचवण्याचा आमचा हेतू साध्य झाला आहे. निश्चितच हा एक अपवादात्मक टीम वर्क व कठीण परिश्रमाचा परिणाम आहे.- अमित पाटे, संस्थापक, स्नॅपटीविटी, इग्लंड
फ्रान्सच्या कान्स फेस्टीवल मध्ये चाळीसगावच्या अमित पाटे यांना दोन सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:46 PM
लायन आॅस्कर पुरस्कार
ठळक मुद्दे चाळीसगावचे सुपुत्रनासा गर्ल स्वीटी पाटे यांचे बंधू