आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २५ - अमळनेर येथील पेट्रोलपंप मालक अली अजगर हकीमोद्दीन बोहरी हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गुन्हेगार कैलास रामकृष्ण नवघरे (रा.गांधलीपुरा, अमळनेर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई पोलिसांच्या मदतीने मुंबई मधील घाटकोपरमधून गुरुवारी पहाटे अटक केली. नवघरे यानेच बोहरी यांच्यावर गावठी पिस्तुलने गोळी झाडली होती.गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुस्तफा शेख मोहम्मद (वय २४, रा. गांधलीपुरा, अमळनेर), तनवीर शेख मुख्तार शेख (वय २३, रा.ख्वॉजानगर, अमळनेर) व तौफिक शेख मुनीर (वय २३, रा.गांधलीपुरा, अमळनेर) या तिघांना अटक केली होती. मुख्य आरोपी असलेला नवघरे मात्र फरार होता.हा गुन्हा उघडकीस आणण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्यावर सोपविली होती. त्यानुसार बच्छाव व कुराडे यांनी अमळनेरात ठाण मांडून हा गुन्हा उघडकीस आणला. दरम्यान, अमळनेरातील प्रा.दीपक पाटील व बोहरा खून प्रकरण पोलिसांसाठी आव्हान ठरले होते. डझनभर घरफोड्या करणारा नवघरे हा कुख्यात गुन्हेगार असून खून व घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.तांत्रिक माहिती ठरली दुवातांत्रिक माहितीच्या आधारावर कैलास नवघरे मुंबई मधील मालाड भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुनील कुराडे हे रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, रवींद्र गायकवाड यांना सोबत घेऊन मुंबईला रवाना झाले होते. तर विजय पाटील व नरेंद्र वारुळे हे जळगावातून नवघरे याची माहिती पथकाला देत होते. नाले खोदकामावर असताना स्थानिक पोलिसांच्या मदतीने कुराडे यांच्या पथकाने नवघरेला घाटकोपरमध्ये घेरले.कैलास नवघरे हा मुख्य आरोपी आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी दोन दिवसापासून मुंबईत सापळा लावला होता. नियोजनपध्दतीने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून खूनाचा उलगडा होण्यासह घरफोडीचेही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.-सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा
अमळनेरात बोहरी यांच्यावर गोळी झाडणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:38 PM
मुंबई येथे पकडले
ठळक मुद्देकैलास नवघरे अट्टल गुन्हेगारतांत्रिक माहिती ठरली दुवा