आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२५ : ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी सतत सोबतीला असणारी सावली शुक्रवारी दुपारी १२.२४ मिनिटांनी एका मिनिटासाठी गायब झाली. या एका मिनिटांच्या कालावधीत ही सावली माणसाच्या पायथ्याशी येऊन थांबली. खगोल प्रेमीसांठी ही आनंदाची पर्वणी असल्याने, त्यांनी विशेष प्रयोग करुन निर्सगाच्या या अनोख्या चमत्काराचा आनंद घेतला. दरम्यान शनिवारी देखील निर्सगाच्या या अनोख्या चमत्काराचा आनंद जळगांवकरांना घेता येणार आहे.अवकाशातील प्रकाशाचा मुख्य स्त्रोत सुर्य आहे. सुर्याचा उत्तर-दक्षिण प्रवास सुरु असतांना वर्षांतून दोन वेळा हा क्षण येत असतो. सुर्य २३.५ अंंश उत्तर ते २३.५ अंश दक्षिण दरम्यान येणाऱ्या अक्षांशावर ज्या वेळेस येतो. त्यावेळेस काही क्षणासांठी मनुष्याची सावली नाहीशी होते. विशेष म्हणजे ही सावली इकडे-तिकडे न पडता थेट आपल्या पायथ्याशी पडत असते. या दिवसाला झीरो शॅडो डे देखील म्हणतात. जळगाव शहर हे २१ अंश उत्तर या अंशावर आहे. सुर्य २५ आणि २६ मे रोजी २१ अक्षांशावर असणार असल्याने त्यावेळी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १२ वाजुन २४ मिनिटांनी शून्य सावली जळगावांत दिसणार असल्याचे खगोलप्रेमींनी सांगितले होते.जळगांवकरांना या क्षणाचा अनुभव घेता यावा, यासाठी खगोल अभ्यासक अमोघ जोशी व विवेक उपासनी यांनी गिरणा टाकीसमोरील, अनुपमा अर्पाटमेंट या ठिकाणी खास सोय केली होती. त्यानुसार सकाळी साडेअकरा पासुन, खगोल प्रेमींनी सावलीच्या हालचालीचे निरीक्षणे नोंदविण्यास सुरुवात केली होती. दुपारी१२.२४ मिनिटांनी ही सावली गायब झाल्यासारखी अचानक कमी होऊन, माणसाच्या पायाजवळ येऊन थांबली.
अन् जळगावात झाली दुपारी सावली गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 9:36 PM
ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी सतत सोबतीला असणारी सावली शुक्रवारी दुपारी १२.२४ मिनिटांनी एका मिनिटासाठी गायब झाली. या एका मिनिटांच्या कालावधीत ही सावली माणसाच्या पायथ्याशी येऊन थांबली. खगोल प्रेमीसांठी ही आनंदाची पर्वणी असल्याने, त्यांनी विशेष प्रयोग करुन निर्सगाच्या या अनोख्या चमत्काराचा आनंद घेतला.
ठळक मुद्देखगोल प्रेमींनी घेतला निर्सगाच्या चमत्काराचा आनंदनिर्सगाच्या चमत्काराचा अनुभव पाहण्यासाठी खास व्यवस्थादुपारी १२.२४ मिनिटांनी सावली गायब झाली