शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली
3
"बटेंगे तो पॉकेट कटेंगे और भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे", महागाईवरून काँग्रेसचा टोला
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंनी थेटच सांगितलं
5
कोरोना काळात केलेली व्हॅक्सीनची मदत; 'हा' देश PM मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने करणार सन्मान
6
बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांकडून त्यांचाच प्रदेश सांभाळला जात नाही; चंद्रशेखर आझादांचे टीकास्त्र
7
'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' या योगी-मोदींच्या घोषणेवर नवाब मलिकांचा प्रहार
8
Jio Financial च्या शेअरमध्ये जोरदार तेजी, 'या' कारणामुळे आली ६ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी 
9
कांद्याचे दर कमी होणार की नाही? जाणून घ्या, भाजीपाल्यांच्या किमतीचा ताजा रिपोर्ट
10
त्रिपुरारी पौर्णिमा: ५ राशींवर हरिहर कृपा, धनलक्ष्मीचे शुभाशिर्वाद; पद-पैसा-समृद्धी वाढ!
11
बलात्कारानंतर शरीरावर ठोकले खिळे, नंतर जिवंत जाळले, मणिपूरमध्ये ३ मुलांच्या आईसोबत क्रौर्य
12
'टीम ट्रम्प'मध्ये ४ वंडर वुमेनवर मोठी जबाबदारी; कुणी चीफ ऑफ स्टाफ, तर कुणी इंटिलिजेंस...
13
यामी गौतमच्या लेकाच्या नावाची झाली चर्चा, 'वेदविद'चा अर्थ सांगत अभिनेत्री म्हणाली...
14
पुण्यात भाजपला मोठा धक्का; पाच पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम, हाती घेतली तुतारी
15
मविआतील धुसफूस उघड! उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा
16
Kartik Purnima 2024: कार्तिक पौर्णिमेला 'या' वेळेतच कार्तिकेयाचे दर्शन घ्या; आर्थिक चिंतेतून मुक्त व्हा!
17
बॉयफ्रेंडसोबत वेगळ्याच हॉटेलमध्ये सापडली मिस युनिव्हर्सची स्पर्धक; फायनलपूर्वीच काढून टाकले...
18
अधिकाऱ्यांना थप्पड मारणाऱ्या नरेश मीणाला अटक, सामरावता गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
19
F&O मध्ये Zomato, Dmart, BSE, Adani सह होणार ४५ नव्या शेअर्सची एन्ट्री, पाहा संपूर्ण लिस्ट
20
"आयुष्याच्या चौकटीत अडकलो...", सिनेमाच्या प्रमोशनवेळी अभिषेक बच्चनने व्यक्त केल्या भावना

“ताई, तू लढत राहा, आम्ही सोबत आहोत”; दिव्यांग ‘बहिणी’ने ओवाळले, देवेंद्र फडणवीस गहिवरले!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 10:20 AM

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाला भेट दिली. या वेळी लक्ष्मी शिंदे हिने पायाने फडणवीस यांचे औक्षण केले.

Devendra Fadnavis News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजळगाव दौऱ्यावर होते. “शासन आपल्या दारी' कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाला भेट दिली. या वेळी लक्ष्मी शिंदे हिने पायाने फडणवीस यांचे औक्षण केले. यानंतर देवेंद्र फडणवीसांचे डोळे पाणावले.

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून माहिती दिली. आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळले. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेने अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा. हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारते. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्याने टिळा लावणाऱ्या, त्याचे पायाने आरतीचे तबक ओवाळणाचा, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहयावर हास्य फुललेले होते. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की, तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे. ते पाहून मी इतकंच म्हणालो, ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले. अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री फडणवीसांचा खडसेंवर हल्लाबोल

जमिनीत तोंड काळे केले नसते तर आज त्यांच्यावर आम्हाला काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती. त्यांना आता नवीन मालक मिळाला आहे, ते सांगतात तसेच ते करतात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे पर टीका केली. मोदींमुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. ते पंतप्रधान राहिले तर, अनेक घोटाळे बाहेर येतील, हे लक्षात आल्यामुळे विरोधक सर्व एकत्र आले आहेत, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalgaonजळगाव