शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाºयांचे जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 4:37 PM

गांधी उद्यानापासून निघाला मोर्चा: केंद्र व राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा

ठळक मुद्देमोर्चास दीड तास उशीरजिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अडविला मोर्चा
लोकमत आॅनलाईनजळगाव, दि.५- मानधन वाढ करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाºयांनी गुरूवार दि.५ रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन स्वत:ला अटक करवून घेत जेलभरो आंदोलन केले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या तसेच महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. आयटक व महाराष्टÑ राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे शहरातील गांधी उद्यानापासून सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यास तब्बल दीड तास उशीर झाला. साडेबारा वाजेच्या सुमारास महात्मा गांधी उद्यानापासून मोर्चास प्रारंभ झाला. त्यात मोठ्या संख्येने अंगणवाडी,बालवाडी सेविका हातात घोषणांचे फलक घेऊन सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दुपारी १ वाजेच्या सुमारास हा मोर्चा धडकला. पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच हा मोर्चा अडविला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कॉ.अमृतराव महाजन यांच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांनी मानधन वाढीच्या तसेच सरकारकडून मागण्या मान्य करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या. अटक व सुटकात्यानंतर या अंगणवाडी सेविकांनी स्वत:ला अटक करवून घेतली. पोलिसांनी या सेविकांना अटक करून नंतर सोडून दिले. या आहेत मागण्या१)दिल्ली, केरळ, बंगलोर, तामीळनाडू, पांडेचेरी या राज्यांनी अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात बºयापैकी वाढ केली आहे. महाराष्टÑ सरकारनेही सेविका, मदतनिसांच्या सहनशिलतेचा अंत न पाहता वेतन वाढीचा निर्णय घ्यावा. २)सेवानिवृत्ती नंतर लाभाची रक्कम २ लाख रूपये करावी. दरमहा ५ हजार रूपये निवृत्तीवेतन मिळावे, ३), टीएचआर बंद करा. त्याऐवजी दर्जेदार खाऊसाठी आवश्यक ती तरतूद करा, ४) मिनी अंगणवाडी केंद्र पूर्ण केंद्रात रूपांतरीत करा.५) अंगणवाड्यांची स्टेशनरी साहित्य सरकारने पुरवावीत. ६) दरमहा १ तारखेपर्यंत मानधन मिळावे. ७) १ महिन्याच्या मानधनाइतका दिवाळी बोनस मिळावा. ८)अंगणवाड्यांचे खाजगीकरण नको. आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.