जळगाव, दि.31- देशभरातील 61 लाख 50 हजार अंगणवाडी कर्मचा:यांना भविष्य निर्वाह निधीचे सभासदत्व लाभणार असून त्यांचा या निधीतील स्वहिस्सा शासन भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विविध संघटनांकडून पाठपुरावा
या कर्मचा:यांना वाढीव वेतन मिळावे, त्यांना भविष्य निर्वाह निधी लागू करावा यासाठी भारतीय मजदूर संघ व विविध कर्मचारी संघटनांकडून पाठपुरावा सुरू होता. या मागणीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत गुरूवारी चर्चा झाली. अध्यक्षस्थानी कामगार मंत्री दत्तात्रय बंडारू हे होते.
61 लाख 50 हजार कर्मचारी
अंगणवाडी क्षेत्रात 61 लाख 50 हजार कर्मचारी आहेत. यात अंगणवाडी कर्मचारी 14 लाख, अंगणवाडी सेविका 12 लाख, आशा वर्कर 10 लाख व माध्यान्य भोजन कर्मचारी 25 लाख 50 हजार असे देशभरातील विविध प्रांतात काम करतात.