लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्या तीन दिवसांपासून येणाऱ्या जेवणाची गुणवत्ता खराब असल्यासंदर्भात काही महिलांनी सोमवारी तक्रारी केल्या. जेवण चांगले असेल तर आमच्यात प्रतिकारक्षमता येईल, असे असताना आम्हाला कमी द्या पण जरा चांगले जेवण द्या, अशी मागणी या महिलांनी केली.
गेल्या काही दिवसांपूर्वी जेवण चांगले येत होते, मात्र, अचानक तीन दिवसांपासून जेवणाची गुणवत्ता चांगली नसल्याची तक्रार या महिलांनी केली.
बेड वाढवले
जागा कमी व रुग्ण अधिक असे चित्र असल्याने अखेर दोन बेडच्या खेालीत आता तिसरा बेड टाकून रुग्णांना ॲडजेस्ट केले जात असल्याचे चित्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये आहे. रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असल्याने जागेची मोठी अडचण निर्माण झाली आहे. काही इमारतींमध्ये स्वच्छतेची कामे सुरू असल्याने सद्यस्थितीत एका खोली तीन बेड टाकून उपाययोजना केल्या जात आहेत.