ऑनलाईन लोकमत अडावद ता.चोपडा, दि. 18 : कृषीपंपांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने वीज मंडळावर संताप व्यक्त करीत येथील शेकडो शेतक:यांनी सोमवारी सकाळी 10-30 वाजता अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावर रास्ता रोको करुन महामार्ग बंद पाडला. यामुळे रस्त्यावरील दोन्ही बाजुने सुमारे 1 कि.मी. पर्यत वाहनांची रांग लागली होती. थकलेली वीज बिले भरावी यासाठी वीज मंडळाने कोणतीही पूर्वसूचना न देता शेतक:यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केला आहे. यामुळे शेती कामे खोळंबल्याने शेतकरी हैराण झाले आहे, परिणामी संतप्त झालेल्या शेतक:यांनी 18 रोजी सकाळी 10-30 वाजता अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावर असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डासमोर महामार्गावर ठाण मांडून रास्तारोको केला. यावेळी वजाहतअली काझी, विरेंद्र बोरसेसह इतर शेतकरी प्रतिनिधींनी वीज मंडळाच्या कारभारावर रोष व्यक्त केला. शेकडोंच्या संख्येने जमलेल्या शेतक:यांनी सुमारे तासभर महामार्ग रोखून धरला. अखेर अडावदचे सहाय्यक अभियंता दिलीप सुंदराणी यांनी शेतक:यांचे निवेदन स्विकारत तात्काळ तोडगा काढून वीजपुवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने शेतक:यांनी आंदोलन मागे घेतले. या वेळी श्रीकांत दहाड, सचिन महाजन, भूषण देशमुख, राधाकृष्ण बाहेती, स्वप्निल काबरा, प्रदिप जाखेटे, संजय देशमुख, मजरखान पठाण, हनुमंत गायकवाड, जितेंद्र देशमुख, शांताराम पवार, भूषण चव्हाण, बापू कोळी, मुरलीधर कोळी, सुरेश बाहेती, रविंद्र चित्ते, दिनेश खंबायत, बापू कुंभारसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अडावद पोलीस स्टेशनचे सपोनि जयपाल हिरे, पोउनि गणेश कोळी, संतोष पारधी, अकील खान, चंपालाल पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
अडावद येथे संतप्त शेतक:यांचा रास्ता रोको, वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 6:39 PM
कृषीपंपांचा विद्युत पुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित करण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या अडावद परिसरातील शेतक:यांनी सोमवारी येथे अंकलेश्वर- ब:हाणपूर महामार्गावर रास्ता रोको केल्याने एक तासार्पयत वाहतूक ठप्प पडली होती.
ठळक मुद्देएक तास झालेल्या रस्ता रोकोमुळे महामार्गावर लागली वाहनांची रांगवीज वितरणच्या अभियंत्यांनी निवेदन स्विकारत आश्वासन दिल्याने आंदोलन मागे