जामनेर, जि.जळगाव : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजप नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची कथित बदनामी केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने त्यांना प्रोसेस इश्यू केले असून, २९ जूनला हजर राहण्याचे आदेश दिले आहे.भाजपचे शेंदुर्णी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी जिल्हा उपाध्यक्ष उत्तम राघो थोरात यांनी, खडसे यांच्या बदनामी प्रकरणी दमानिया यांच्याविरुद्ध १६ आॅगस्ट २०१६ रोजी फौजदारी खटला क्रमांक ४६०/२०१६ येथील न्यायालयात दाखल केला होता.न्यायालयाने चौकशी करुन कागदपत्रांची तपासणी केली व युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर भादंवि कलम ४९९ व ५०० प्रमाणे मंगळवारी प्रोसेस इश्यू जारी केले. थोरात यांच्याकडून अॅड.प्रदीप शुक्ला काम पाहत असून, त्यांना जळगाव येथील अॅड. व्ही.एच.पाटील मदत करीत आहे.
अंजली दमानिया यांना जामनेर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 3:25 PM
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजप नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची कथित बदनामी केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने त्यांना प्रोसेस इश्यू केले असून, २९ जूनला हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
ठळक मुद्देखडसे कथित बदनामी प्रकरण२९ जूनला हजर राहण्याचे निर्देश