जळगाव : माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात राज्यभरातील विविध न्यायालयांमध्ये अब्रुनुकसानीचे खटले दाखल केले आहेत. परंतु दमानिया यांच्याकडे सबळ पुरावे नसल्याने त्या गेल्या ३ वर्षांपासून अब्रुनुकसानीच्या खटल्यांपासून पळ काढत आहेत, असा आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दमानिया यांच्यावर केला आहे.जळगावात रविवार, १२ जानेवारी रोजी बोलताना खडसे यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, तीन वर्षांपूर्वी दमानिया यांनी आपल्यावर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप केले होते. त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही, असे आमचे म्हणणे होते.त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील विविध २७ ठिकाणी दमानिया यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचे दावे दाखल केले आहे.दमानिया यांनी माझ्यावर केलेले आरोप पुराव्यांनिशी सिद्ध करावेत, अन्यथा अब्रुनुकसानीपोटी भरपाईच्या कारवाईला सामोरे जावे, असे या दाव्यांमध्ये म्हटले आहे.जळगाव न्यायालयातदेखील भाजप कार्यकर्ते अशोक लाडवंजारी यांनी अॅड. व्ही. एच. पाटील यांच्यावतीने दमानिया यांच्याविरुद्ध दावा दाखल केला आहे. त्याची पुढील सुनावणी २३ जानेवारी रोजी होणार आहे. तीन वर्षांपासून विविध न्यायालयात सुनावण्या सुरू आहेत. मात्र दमानिया ह्या पुरावे सादर करू शकलेल्या नाहीत. प्रत्येक सुनावणीला पुढची तारीख मागतात. तसेच वेगवेगळ््या ठिकाणी सुनावणी घ्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे करतात. त्या पुरावे सादर करण्यात असमर्थ ठरल्याने अब्रुनुकसानीच्या खटल्यांपासून पळ काढत आहेत, असा आरोप खडसे यांनी केला. या वेळी अंजली दमानिया यांच्याव्यतिरिक्त अन्य दुसऱ्या विषयावर बोलण्यास खडसेंनी स्पष्ट शब्दात नकार दिला.राजकारणात काम न उरल्याने खडसेंचे रिकामे उद्योग-दमानिया४एकनाथराव खडसे यांनी माझ्यावर केलेले आरोप अत्यंत चुकीचे आणि हास्यास्पद आहेत. राजकारणात त्यांना आता काहीही काम उरलेले नसल्यानेच ते असले उद्योग करीत आहेत, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसे यांच्यावर पलटवार केला.४त्या म्हणाल्या की, खडसे यांच्याविरोधात माझी लढाई मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. त्याठिकाणी मी एक हजार १०० पानांची याचिका दाखल केली असून त्यात खडसे यांच्या विरोधातील सर्व पुरावे न्यायालयासमोर मांडले आहेत. त्यामुळे दमानिया न्यायालयात पुरावे सादर करू शकल्या नाहीत, त्या पळ काढत आहेत, हे आरोप हास्यास्पद आहेत. एवढेच नाही तर पुण्याला जो ‘सी समरी रिपोर्ट’ दाखल करण्यात आला होता, त्याला आव्हान देणारी प्रोटेस्ट पिटीशन दाखल केली होती. त्यावर आता ४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.४जळगाव न्यायालयात अशोक लाडवंजारी यांनी जो दावा दाखल केला आहे, असे खडसे सांगत आहेत. परंतु, ते खोटं बोलत आहेत. तो खोटा दावा स्वत: खडसे यांनी केला आहे. त्यात २३ जानेवारीला सुनावणीस आपण हजर राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.
अंजली दमानिया काढताहेत सबळ पुराव्यांअभावी पळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:55 AM