याावेळी निवृत्त प्राध्यापक डॉ. एस. व्ही. सोमवंशी, विद्यापीठाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ.संजय शेखावत, एसएसबीटीचे डॉ.किरण पाटील, शिक्षक रामचंद्र पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉ. संदीप पाटील, शिक्षक अतुल पाटील, नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील व्यवस्थापक राजेंद्र पाटील उपस्थित होते.
शाळा गटात राज्यस्तरीय नोबेल विज्ञान प्रेरणा पुरस्कार कराड जिल्हा सातारा येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेला जाहीर झाला आहे. बारामती येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन आणि जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शानबाग विद्यालय यांना राज्यस्तरीय नोबेल विज्ञान प्रेरणा या पुरस्कारासाठी द्वितीय सन्मान मिळालेला आहे. तर शिक्षक गटासाठी दिला जाणारा डॉ. सी. व्ही. रमण विज्ञान शिक्षक पुरस्कार भुसावळ येथील के नारखेडे विद्यालयाचे विज्ञान शिक्षक भानुदास जोगी यांना जाहीर झाला आहे. तसेच मालेगाव येथील कै ल. रा.काबरा विद्यालयाचे महेश बागड आणि सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या शिक्षिका उर्मिला नाचन यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहे.
जळगावच्या विद्यार्थीला उत्तेजनार्थ पुरस्कार
विद्यार्थी या गटात कराड येथील यशवंत विद्यालयाचा विद्यार्थी ओम कुत्ते या विद्यार्थ्याला डॉ. ए.पी.जे कलाम बालवैज्ञानिक पुरस्कार देण्यात येत असून, जळगाव येथील प्रगती विद्यालयाचा विद्यार्थी कौस्तुभ पवार आणि पनवेल जिल्ह्यातील वा. जे . हायस्कुल ची विद्यार्थिनी संजीवनी मढवी हिला उत्तेजनार्थ बाल वैज्ञानिक पुरस्कार जाहीर झाले आहेत.