डमी..
मृत्यू - ०१
जखमी - २५६
अपघात - ३०१
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची समस्या बिकट होत जात आहे. महानगरपालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतींही व्यवस्था
अद्याप केलेली नाही. त्यामुळे समस्या अधिकच बिकट होत असून, गेल्या १० महिन्यात ५७ जणांना चावा घेतला आहे. यामध्ये एका दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे.
मनपाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अमरावती येथील एका संस्थेला दीड कोटींची निवीदाप्रक्रीया राबवून मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा मक्ता देण्यात आला होता.
मात्र, काही प्राणी प्रेमींनी या कामाबाबत आक्षेप घेतल्यानंतर केंद्र शासनाने मनपाला हे काम थांबविण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, आता चार महिन्यांपासून हे काम थांबले आहे. त्यामुळे शहरात कुत्र्यांची संख्या वाढत
जात असून, सध्यस्थितीत शहरात १८ हजार मोकाट कुत्रे आहेत. शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यालगत मोकाट कुत्र्यांचा हौदोस सर्वात जास्त आहे.
मनपाकडे कुत्रे पकडण्यासाठी व्यवस्थाच नाही
मनपाने सुरु केलेले निर्बीजीकरणाचे काम थांबले असल्याने मनपाने शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. आधी मोकाट कुत्र्यांना शहराबाहेर सोडण्यात येत होते. मात्र, हे काम
देखील आता मनपाने थांबविले आहे.
२०० हून अधिक कुत्र्यांचे निर्बीजीकरण
मनपाने डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० पर्यंत अमरावतीच्या संस्थेला मोकाट कुत्र्यांवर नीर्बीजीकरण करण्याचा मक्ता दिला होता. या संस्थेने या तीन महिन्यात
२०० हून अधिक कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्यात आले. यासाठी डॉगरुम देखील तयार करण्यात आला होता. नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मनपाकडून त्या भागात जावून मोकाट कुत्र्यांना पकडून
प्रक्रिया केंद्रावर आणले जात होते.
या भागात त्रास
शहरातील शिवाजीनगर, लक्ष्मी नगर, केसीपार्क परिसर, निमखेडी परिसर, शंकरराव नगर, कांचन नगर, जुने जळगाव, गोपाळपुरा, अयोध्या नगर,
ममुराबाद रोड, शनिपेठ, खोटेनगर, नेरी नाका परिसर, चंदू अण्णा नगर भागात सर्वाधिक मोकाट कुत्र्यांचा त्रास आहे. तर मेहरूण भागात व आव्हाणे
शिवारातील कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा त्रास आहे.
कोट..
मोकाट कुत्र्यांचा त्रासामुळे रात्री ७ वाजेनंतर घराबाहेर चालणेही कठीण आहे. विशेष म्हणजे लहान मुलांना घराबाहेर आणणेच धोक्याचे आहे.
प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या ही वाढतच जात आहे.
-सुनील पाटील, रहिवाशी, चंदु अण्णा नगर
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने एका संस्थेला काम दिले होते. मात्र, या संस्थेच्या कामाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार
हे काम बंद करण्यात आले. लवकरच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी उपाययोजना केल्या जातील.
-उदय पाटील, प्रभारी आरोग्य अधिकारी