भडगाव : तालुक्यातील गुढे शिवारातील हाशाबाबा मंदीरावरील ५० वर्षीय साधुचा खुन झाल्याची घटना गुरुवार २२ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गुढे ते जुवार्डी रस्त्यावरील हाशाबाबा मंदीराजवळ घडली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयत साधू हे गुढे शिवारातील हाशाबाबा मंदीरावर जवळपास १ वर्षापासून राहत होते. अज्ञात इसमाने त्यांच्या डोक्यात लाकडी दांडा मारुन जबर जखमी करीत ठार मारले आहे. गुढे ते जुवार्डी रस्त्यावर हा साधु जखमी अवस्थेत दिसून आले. त्यानंतर रात्रीच पुढील उपचारासाठी साधुला १०८ रुग्णवाहिकेने धुळे येथे रवाना करण्यात आले. उपचारादरम्यान साधुचा मृत्यु झाला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक नजीर शेख, पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, उपनिरीक्षक आनंद पठारे यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट दिली. जळगावच्या श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला प्रदीप सुभाष पाटील (रा. जुवार्डी, ता.भडगाव) यांनी दिलेल्या फियार्दीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द भादंवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुढे शिवारात अज्ञात व्यक्तीने केला साधुचा खुन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:11 PM
गुढे शिवारातील हाशाबाबा मंदीरावरील ५० वर्षीय साधुचा खुन झाल्याची घटना गुरुवार २२ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गुढे ते जुवार्डी रस्त्यावरील हाशाबाबा मंदीराजवळ घडली.
ठळक मुद्देगुढे ते जुवार्डी रस्त्यावरील हाशाबाबा मंदिरावरील घटनाभडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हालाकडी दांडा मारून केले गंभीर जखमी