जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 441 झाली*
जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ, धरणगाव, जळगाव, एरंडोल, भडगाव, अमळनेर येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 30 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 17 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर *तेरा* व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ शहरातील 5, अमळनेर येथील 2, जळगाव येथील 3, तर तळवेल, ता. भुसावळ, एरंडोल व भडगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 441 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.