आॅनलाईन लोकमत जळगाव दि,२९ : तालुक्यातील सुभाषवाडी येथे झालेल्या दंगल प्रकरणात रविवारी पोलिसांनी २१ जणांना अटक केली. शनिवारी १४ आरोपींना अटक करण्यात आली होती. तर त्याआधी ४ आरोपींना अटक झालेली आहे. आता अटक केलेल्या आरोपींची एकुण संख्या आता ३९ झाली आहे. शेतातील कृषी पंपाचे नुकसान केल्याच्या कारणावरुन बुधवारी रात्री दोन गटात दंगल झाली होती. सरपंचासह ५६ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक निलेश सोळुंखी, शरद भालेराव, जितेंद्र राठोड,कैलास धाडी व गोविंदा पाटील, प्रकाश पवार व संतोष यांच्या पथकाने रविवारी पहाटेपासून गावात अटकसत्र राबविले. त्यात जगन दगडू सोनवणे (वय ४५), अनिल जगन राठोड (वय २४), मिथून जगन राठोड (वय २०), धोंडू उखा चव्हाण (वय ५०), ईश्वर धोंडू चव्हाण (वय २३), आप्पा गुलाब राठोड (वय ४१), बाजीराव गुलाब राठोड (वय २५), अर्जुन सोनसिंग राठोड (वय ३१), जयसिंग फुलसिंग राठोड (वय ४०), ज्ञानेश्वर जयसिंग राठोड (वय ४०), सोमा रामदास राठोड, गंगाराम शेटू पवार (वय ६५), रवींद्र गंगाराम पवार (वय ३५), रमेश बाबुलाल राठोड (वय ४०), ग्यानदास सरदार राठोड (वय ५६), इंदल सरदार राठोड (वय ४८), राहूल सोमा राठोड (वय २३), पंकज सोमा राठोड (वय २१), योगेश धोंडू चव्हाण (वय २०) व एक अल्पवयीन अशा २१ जणांचा अटक करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यातील ९ जण दवाखान्यात दाखल आहेत तर अन्य फरार आहेत.
१४ जणांना एक दिवस पोलीस कोठडीशुक्रवारी सायंकाळी अटक केलेल्या प्रितम परशुराम राठोड (वय २३) तुळशीराम परशुराम राठोड (वय २६), राहूल पंडीत चव्हाण (वय १८), अनिल रामदास चव्हाण (वय २१), साहेबराव गुलाब राठोड (वय २१), सुनील चरणदास चव्हाण (वय २०), युवराज रुपचंद राठोड (वय ३०), प्रेमसिंग त्र्यंबक राठोड (वय २७), मलखान हिरा राठोड (वय २१), संदीप जंगी चव्हाण (वय २१), जगन लालचंद राठोड (वय ३६), विलास श्रावण राठोड (वय २७), नवलसिंग लालसिंग राठोड (वय ३०) व विनोद पंडीत चव्हाण (वय २३) या १४ जणांना तपासाधिकारी योगेश शिंदे यांनी शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्या.वानखेडे यांनी १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.