जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग थांबता थांबत नसून मंगळवारी तब्बल २१७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दुसरीकडे मंगळवारी १११ जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ९२, जळगाव ग्रामीण ११, भुसावळ ०६, अमळनेर ०१, चोपडा ११, भडगाव ०५, धरणगाव ०२, यावल ०६, एरंडोल ०३, जामनेर ५, पारोळा २६, चाळीसगाव १८, बोदवड १५, दुसऱ्या जिल्ह्यातील ०१ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४ हजार ८०३ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.