जळगाव : जिल्ह्यात बुधवारी नव्याने १३८ कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली असून दिवसभरात ८८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले तर सहाजणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. नव्याने आढळलेल्या १३८ कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक म्हणजे ३९ रुग्णांची संख्या जळगाव शहरातील आहे. शहरातील शिवाजीनगर येथे कोरोनाचा कहर सुरुच असून बुधवारी आणखी ४ रुग्ण आढळले.बुधवारी ९२० रुग्णांपैकी १३८ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळले आहेत तर ६३६ रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले. जळगाव शहरात ३९, तालुक्यात ६ रुग्ण आढळले.बोदवड तालुक्यातही आता कोरोनाचा फैलाव वाढला असून तेथे बुधवारी १९ रुग्ण आढळले. यावल व भुसावळमध्ये १३ तर चोपडा तालुक्यात ११ नव्या रुग्णांची नोंद झाली.जिल्ह्यात बुधवारी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये अमळनेर, धरणगाव प्रत्येकी २, रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात प्रत्येकी १ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात २१९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १२७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. १६३ जणांची प्रकृती गंभीर आहे. बुधवारी ८८ जणांनी कोरोनावर मात केली.त्यांना सोडण्यात आले.या भागात आढळले नवीन रुग्णशिवाजीनगर-४, आदर्शनगर-२, हिरा -शिवा कॉलनी, नवीपेठ, एमजे कॉलेज परिसर, मयूर कॉलनी, आकाशवाणी रोड, केमिस्ट भवन, मुंदडा नगर, वाल्मिकनगर, मेहरूण, तानाजी मालुसरे नगर, आसाराम बापू आश्रम, न्यू बी. जे मार्केट, रामानंद नगर येथील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे.मृतांमध्ये ५० वर्षावरील रुग्णच जास्तबुधवारी मृत झालेल्या ६ रुग्णांमध्ये ५० ते ६० वयोगटातील २, ६० ते ७० वर्षे वयोगटातील १ तर ८० वर्षावरील २ रुग्णांचा समावेश आहे. एका २५ वर्षीय तरूणाचाही कोरोनामुळे बुधवारी मृत्यू झाला.
शहरात आणखी ३९ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 12:35 PM