जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे़ गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे़ जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा नवीन ५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील १७, जळगाव ग्रामीण ०३, भुसावळ २०, अमळनेर ०१, चोपडा ०२, यावल ०१, एरंडोल ०२, जामनेर ०३, रावेर ०१, पारोळा ०२ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १५७८ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.अशी आहे बाधितांची संख्याजळगाव शहर - २९७जळगाव ग्रामीण- ४४भुसावळ - ३००अमळनेर - २१७चोपडा- १०१पाचोरा- ४१भडगाव - ८९धरणगाव - ७४यावेल - ७१एरंडोल - ४१जामनेर - ८०रावेर - ११०पारोळा- ६९चाळीसगाव - १७मुक्ताईनगर - ११बोदवड- १२बाहेरील जिल्ह्यातील- ०४