यावल, जि.जळगाव : तालुक्यातील डोंगरकठोरा येथील शरीफ मेहरबान तडवी या १७ वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तालुक्यातील मारुळ येथील २५ वर्षीय रमजान महारू तडवी यास रविवारी रात्री अटक केली. याप्रकरणी अटकेत असलेल्या संंशयित १६ वर्षीय बालगुन्हेगाराचा तो सख्खा मेहुणा आहे. त्यामुळे या खून प्रकरणातील संशयित आरोपींंची संख्या आता दोन झाली असल्याचे फैजपूर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी पत्रकारांना सांगितले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, तपासाधिकारी एपीआय सातिका खैरनार उपस्थित होत्या.डोंगरकठोरा येथील शरीफ तडवी या युवकाचा बुधवारी रात्री धारदार शस्त्राने गळा कापून खून करण्यात आल्यानंतर गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. बहिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याच्याच १६ वर्षीय संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. तो सध्या बालन्यायालयीन कोठडीत आहे, तर रविवारी रात्री मारुळ येथील रमजान महारू तडवी या दुसºया संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.खुनाची घटना उघडकीस आल्यांनतर काही तासातच पोलिसांनी १६ वर्षीय मुलास संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीअंती एकट्यानेच खून केला असल्याचे सांगून घटनेचे त्याने वर्णन केले होते, असे डीवाय.एस.पी. पिंगळे यांनी सांगितले. मात्र घटनास्थळावरील अन्य बाबी पाहता तसेच एका तरूणाचा त्याचाच समवयस्क एकटा मित्र जागेवर खून करू शकणार नाही. कारण मयत शरीफकडूनही प्रतिकार होण्याची शक्यता असल्याने त्या संशयित बालकाकडून पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे लक्षात आले होते. तपासाधिकारी सपोनि सारीका खैरनार, हे.कॉ.संजय तायडे यांनी अधिक चौकशी केली असता मारुळ येथील रमजान तडवी या मेहुण्यास बोलविले असता त्याच्या डाव्या हातासही जखम आढळून आली. त्यास कारण विचारले असता गवत कापताना विळा लागल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तेव्हा पोलिसी खाक्या दाखवताच घटनास्थळावर सोबत असल्याचे सांगीतले.घटनेचे कारणगेल्या काही दिवसांपूर्वी संशयित बालगुन्हेगारास शरीफचे त्याच्या बहिणीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. तेव्हापासूनच त्याचे डोक्यात शरीफला संपवण्याचा कट सुरू होता आणि बालगुन्हेगाराने घटनेच रात्री त्यास शौचविधीस जायचे आहे, असे म्हणून फोन करून बोलावले व त्यास तेल्या नाल्याचे काठावर नेवून तेथे त्याच्या डोक्यावर दगड मारून व सुरीने गळा चिरून खून केला. हा कट अत्यंत नियोजनबध्द असल्याने दोन संशयितासह अन्य आरोपीची संख्या यात आहे का, याबाबतही पोलीस कसोशीने तपास करीत असल्याचे सांगून पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भायश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू असल्याचे सांगितले.
डोंगरकठोरा येथील शरीफ तडवी खून प्रकरणी दुसऱ्या आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 6:12 PM
डोंगरकठोरा येथील शरीफ मेहरबान तडवी या १७ वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तालुक्यातील मारुळ येथील २५ वर्षीय रमजान महारू तडवी यास रविवारी रात्री अटक केली.
ठळक मुद्देदुसरा संशयित बालगुन्हेगाराचा सख्खा मेहुणायाआधी १६ वर्षीय संशयितास अटक