मुक्ताईनगर : तालुक्यात 2007-08 व 2008-09 या वर्षात अनुक्रमे मंजुरी मिळालेल्या व सुधारित अंदाजपत्रकाला पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मंजुरी दिल्यानंतर मूल्यांकनात अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने तालुक्यातील सहा गावे व 12 पदाधिका:यांकडून अपहारीत रक्कम वसूल करण्याचे व 17 र्पयत पैसे न भरल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिका:यांनी दिले. या संपूर्ण प्रकरणामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. 14 मार्च रोजी पुन्हा एक नोटीस प्राप्त झाली आहे. चिंचखेडा बु.।। येथील तत्कालीन समितीचे अध्यक्ष नरेंद्र माणिकराव गावंडे यांना 14 रोजी नोटीस मिळाली आहे. त्यांच्याकडून 37 हजार 371 रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी डी.आर. लोखंडे यांनी दिली. त्यामुळे आता एकूण सहा गावांसाठी 12 पदाधिका:यांविरुद्ध नोटीस बजावण्यात आल्या असून आता वसुलीची रक्कम 10 लाख सहा हजार 120 एवढी झाली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा (दोन), अंतुर्ली (दोन), तरोडा-भांडगुरा (दोन) व चांगदेव (दोन), चिखली (दोन) तसेच चिंचखेडा बु।।(दोन) या सहा गावांसाठी मूळ अंदाजपत्रकांसाठी 2007-08 व 2008-09 या आर्थिक वर्षांमध्ये 12 पाणीपुरवठा मंजूर झाल्या होत्या. त्यानंतर 2009-10 व 2010-11 मध्ये त्यांना सुधारित अंदाजपत्रके मंजूर करून रक्कम वाढवून घेतल्या.या गावांमधील योजनांमध्ये झाला अपहार महालखेडा (दोन), अंतुर्ली (दोन), तरोडा-भांडगुरा(दोन) व चांगदेव (दोन), चिखली (दोन) तसेच चिंचखेडा बु।।(एक) या सहा गावांसाठी मूळ अंदाजपत्रकांसाठी 2007-08 व 2008-09 या आर्थिक वर्षामध्ये 11 पाणीपुरवठा मंजूर झाल्या होत्या. त्यानंतर 2009-10 व 2010-11 मध्ये त्यांना सुधारित अंदाजपत्रके मंजूर करून रक्कम वाढवून घेतल्या.अपहारीत रक्कम वसुली संदर्भात 14 मार्च रोजी पुन्हा एक नोटीस चिंचखेडा बुद्रूक येथील तत्कालीन पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष नरेंद्र गावंडे यांना मिळाली आहे. अपहारातील रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया वरिष्ठांच्या आदेशावरुन केली जाईल.- डी.आर. लोखंडे, गटविकास अधिकारी
शासनाकडून आणखी एक नोटीस
By admin | Published: March 17, 2017 12:11 AM