फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : कोरोना संसर्गजन्य आजारासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने शहरातील बसस्थानकासमोरील अमर शॉपिंग मॉलला सील ठोकण्याची कारवाई पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी शनिवारी केली. सलग दुसऱ्या दिवशी अशी कारवाई होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.शुक्रवारी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी शहरातील एक कापड दुकान व ब्रँंडी हाऊसवर नियमाचे उल्लंघन केल्याने सील ठोकले होते. त्यानंतर व्यावसायिक व नागरिक काहीतरी धडा घेतील असे वाटत असतानाच बसस्थानकासमोरील अमर शॉपिंग मॉलमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होती. तसेच याठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने मुख्याधिकारी किशोर चव्हाण, विपूल साळुंखे व पालिकेचे कर्मचारी यांनी धडक भेट देताच मॉल ला सील करण्याची कारवाई केली अशी माहिती स्वत: मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली
फैजपुरात आणखी एका शॉपिंग मॉलला ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 17:22 IST
नियमांचे उल्लंघन केल्याने शहरातील बसस्थानकासमोरील अमर शॉपिंग मॉलला सील ठोकण्याची कारवाई पालिकेने केली.
फैजपुरात आणखी एका शॉपिंग मॉलला ठोकले सील
ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन केल्याने पालिकेची धडक कारवाईयाआधी कापड दुकान आणि ब्रॅण्डी हाऊसवर झाली होती कारवाई