जळगाव : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य नीट परीक्षेच्यावेळी त्रिमूर्ती इन्स्टीट्युट आॅफ टेक्नोलॉजी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राच्या ब्लॉक नं़ १० मध्ये उत्तरपत्रिका वाटपाचा घोळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ याबाबत पालकांनी ह्यलोकमतह्ण कार्यालयात येऊन तक्रार दिली आहे़केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देशभरातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर नीट ही सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते़ त्यानुसार शहरातील ओरियन सीबीएनई स्कूल, मू़जे़ विवेकानंद भवन, सेंट जोसेफ स्कूल, त्रिमूर्ती इन्स्टीट्युट आॅफ टेक्नॉलॉजी यासह इतर केंद्रांवर नीट परीक्षा पार पडली़ पाच हजार विद्यार्थ्यांपैकी रविवारी साडेचार हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़गैरहजर विद्यार्थ्याचा पेपरदरम्यान, या परीक्षा केंद्रावरील ब्लॉक नं़ १० मध्ये ३६ विद्यार्थ्यांपैकी १ विद्यार्थी गैरहजर होता़ पर्यवेक्षकाने उत्तरपत्रिका वाटप करताना गैरहजर मुलाच्या पीक़्यू़आऱएस़प्रमाणे तो पेपर त्याच बेंचवर ठेवायला हवा होता़ तसे न करता त्या गैरहजर विद्यार्थ्यांचा पेपर पुढील विद्यार्थ्याला दिला़सर्व पेपर वाटप झाल्यानंतर एक पेपर शिल्लक राहिल्याचे पर्यवेक्षकाच्या लक्षात आले़ अन् उरलेला पेपर हा पर्यवेक्षकाने त्या रिकाम्या बेंचवर ठेवला़ या गोंधळामुळे पीक़्यू़आऱएस़प्रमाणे उत्तरपत्रिकांचे वाटप झाले नाही़ ज्यांना आर फोर उत्तरपत्रिका मिळायला हव्या होत्या़ त्यांना एस फोर उत्तरपित्रका मिळाली़ म्हणजेच उत्तरपत्रिका व विद्यार्थी कोड याप्रमाणे पीक्यूआरएस प्रमाणे उत्तरपत्रिकांचे वाटप झालेले नाही़ या वाटपात घोळ झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे़ हा संपूर्ण प्रकार पाल्यांनी घरी आल्यावर सांगितल्याचेही पालकांनी सांगितले़दरम्यान, या प्रकारामुळे पालक आणि पाल्य अशा दोघांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.मात्र जर उत्तरपत्रिकेवर प्रश्नपत्रिकेवरील सिरीज ही विद्यार्थ्याने योग्य लिहिलेली असेल तर त्या विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, असे समन्वयक सांगत असले तरी याबाबत पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे तो दूर करण्याचे काम करावे लागणार असल्याची चर्चा ऐकायला मिळाली.एनसीईरटी, नीटकडे पालक करणार तक्रार... राज्यभरातून या केंद्रावर विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली़ उत्तरपत्रिकांच्या वाटपाच्या घोळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी पालक एनसीईआरटी व नीटकडे तक्रार करणार आहेत़ तक्रारीसाठी आॅनलाइन संकेतस्थळ अजून उघडले नसल्यामुळे एका पालकाने लोकमत कार्यालयात येऊन संपूर्ण हकीकत सांगत तक्रार अर्ज दिला.गोंधळामुळे नुकसान तर होणार नाही?गैरहजर विद्यार्थ्याची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका ही पुढील विद्यार्थ्याला मिळाली़ त्यामुळे गैरहजर विद्यार्थ्याच्या पुढील सर्व विद्यार्थ्याचे नुकसान तर होणार नाही, अशी भिती पालकांमध्ये निर्माण झाली आहे़ तसेच कुणी एनसीईआरटी तर कुणी नीटकडे तक्रार करण्यास सांगतात़ मात्र, नीटबाबतकुणीच नीटमार्गदर्शन करीत नसल्याचा आरोप एका पालकाने केला आहे़ याप्रकाराची शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे़पीक़्यू़आऱएस़ सिरीजपैकी ज्या सीरिजची प्रश्नपत्रिका असेल़ ती सीरिज जर विद्यार्थ्याने त्याच्या उत्तरपत्रिकावर लिहीलेली असेल तर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही़ याची पालकांनी दक्षता घ्यावी़-अब्राहम मॅथ्यू, नीट, सिटी कॉर्डीनेटर
‘नीट’च्या उत्तरपत्रिका वाटपात घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 12:04 PM