जळगाव :
जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासह कोरोना स्प्रेडर शोधण्यासाठी जिल्हा पोलीस दल व आरोग्य विभागाने मंगळवारी रात्री विनाकारण फिरणाऱ्य १२० नागरिकांची चक्क रस्त्यावरच चाचणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत हा उपक्रम राबविण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नाही. हा संसर्ग थांबविण्यासाठी व एखाद्या बाधिताकडून इतर कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच ॲन्टिेजेन चाचणी करण्याचा उपक्रम पोलीस दल व आरोग्य विभागाने घेतला आहे. या उपक्रमाची मंगळवारपासून शहरात अंमलबजावणी करण्यात आली. स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी रस्त्यावर उतरून वैद्यकीय अधिका-यांच्या मदतीने विनाकारण फिरणा-यांची अँन्टीजन चाचणी केली. आकाशवाणी चौक आणि काव्यरत्नावली चौकात विनाकारण फिरणाऱ्यांची मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली. सुमारे १२० नागरिकांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली आहे. दरम्यान, या चाचणीत पॉझिटिव्ह कुणीही आढळून आले नाही. दरम्यान, पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या व्यक्तींना लागचली कोविड केअर केंद्रात उपचारार्थ दाखल केले जाणार आहे.