रावेर, जि.जळगाव : माया ममतेचे मंदिर असलेल्या मातेच्या मांगल्यापुढे कुटुंंबाच्या रक्षणासह पालन पोषण करणारा व शिक्षणासह संस्कार रूजवणारा हिमशिखरासारखा बाप समाजमनात उणे पडत असला तरी त्याच्या कठोर मनातील प्रेमाची लाघवी ऋजुता पेलण्याची कुवत समाजमनात नसल्याची खंत धुळे येथील व्याख्याते अनुराधा कोकणी यांनी येथे व्यक्त केली. खान्देश माळी महासंघातर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी खान्देश माळी महासंघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शकुंतला महाजन होत्या.प्रास्ताविक पिंटू महाजन यांनी केले. परिचय दिलीप वैद्य यांनी केला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुंजलवाडी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा वैद्य, निंबोल शाळेतील प्राथमिक शिक्षिका कल्पना पाटील, वाघोडच्या सरपंच शारदा पाटील, रावेर येथील अंगणवाडी सेविका संगीता अटकाळे व नगरसेवक संगीता महाजन यांचा ‘सावित्रीच्या लेकी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.व्यासपीठावर नगरसेविका रंजना गजरे, शारदा चौधरी, भारती चौधरी, छाया महाजन, उषा पाटील, भारती अग्रवाल, अंजली महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, नगरसेवक अॅड.सूरज चौधरी, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, दिलीप अग्रवाल, भास्कर महाजन, एल.डी.निकम, हेमेंद्र्र नगरिया, प्रभुदत्त मिसर आदी महिला व समाजबांधव उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी महासंघाचे कांतीलाल महाजन, श्रीराम महाजन, रामकृष्ण महाजन, श्यामराव चौधरी, अतुल महाजन, केशव महाजन, आकाश महाजन, जगदीश चौधरी, प्रकाश महाजन, राहुल महाजन, उषाबाई महाजन, मंगलाबाई महाजन, प्रमिला महाजन सविता महाजन यांनी केले. सूत्रसंचालन व आभार चैताली महाजन व पल्लवी महाजन यांनी मानले.
आईच्या माया ममतेपुढे कुटुंंबाला सुरक्षितता व संस्कार देणारा बाप उणे पडू नये : अनुराधा कोकणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 4:41 PM
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलान ‘सावित्रीच्या लेकी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
ठळक मुद्देरावेर खान्देश माळी महासंघातर्फे सावित्रीच्या लेकींचा गौरव‘सावित्रीच्या लेकी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान