अजय पाटील जळगाव : कोरोना व्हायरस पसरल्यामुळे चीन सरकारने कापसाची ८० टक्के आयात-निर्यात थांबवली आहे. त्यामुळे ३ लाख गाठी भारताकडे पडून आहेत. निर्यात थांबल्यामुळे सीसीआयने देखील जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र बंद केले आहेत. शासकीय खरेदी बंद झाल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पुन्हा लूट सुरु झाली असून शेतकºयांनाही नाईलाजास्तव हमीभावापेक्षा ५०० रुपये कमी दराने कापूस विक्री करावा लागत आहे.दरवर्षी भारताकडून १२ ते १५ लाख गाठी चीनला निर्यात होतात. यंदा जानेवारीपर्यंत ६ लाख गाठींची निर्यात चीनमध्ये झाली आहे. मात्र, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रमाणामुळे भारतातून जाणारा माल देखील चीनने थांबवला आहे. भारताकडून चीनला पाठविण्यात येणाºया ३ लाख गाठी पडून आहेत. केंद्र बंद करण्याचा फतवासीसीआयचे केंद्र दरवर्षी मार्च-एप्रिलपर्यंत सुरु असतात. मात्र, ३० जानेवारी रोजी सीसीआयने तातडीने पत्र काढून ५ फेब्रुवारीपर्यंत कापूस खरेदी थांबविली. तसेच पुढील आदेश येईपर्यंत खरेदी सुरु करू नये असेही आदेश काढले आहेत. कापूस खरेदी थांबविण्याबाबतचे कोणतेही कारण सीसीआयने दिलेले नाही.हमीभावात १०० रुपयांची घटआंतरराष्टÑीय बाजारात पसरलेल्या मंदीचा परिणाम कापसाच्या भावावर देखील झाला लाखो गाठी भारताच्या बाजारातच पडून असल्याने आठवडाभरात हमीभावात १०० रुपयांची घट झाली आहे. शासनाने कापसाचा हमीभाव ५५५० इतका निश्चित केला होता. मात्र, सध्या ५४५० इतक्या भावाने कापसाची खरेदी होत आहे. सीसीआयने जरी खरेदी थांबवली असली तरी मात्र पणन महासंघाचे खरेदी केंद्र सुरु आहेत.शासकीय खरेदी थांबल्याने शेतकºयांची लुट सुरुहमीभावात १०० रुपयांची घटव्यापाºयांकडून हमीभावापेक्षा तब्बल ५०० रुपये कमी दराने होतेय खरेदीअद्याप ५० टक्के कापूस शेतकºयांच्या घरातचसीसीआयचे केंद्र बंद होताच व्यापारी-एजंट सक्रीय४आतापर्यंत जिनींग किंवा शासकीय खरेदी केंद्रावर १५ लाख क्ंिवटल कापसाची खरेदी झाली आहे. अद्याप ५० टक्के माल शेतकºयांच्या घरातच पडून आहे. त्यातच शासकीय खरेदी थांबल्यामुळे आता ती पुन्हा सुरु होईल की नाही ? याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आता शेतकºयांना खासगी जिनींग व व्यापाºयांना माल देण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत व्यापाºयांकडून ४७०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल कापूस खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकºयांचे तब्बल ५०० ते ६०० रुपयांचे नुकसान होत आहे.कोरोना व्हायरसमुळे चीनने बाहेरच्या देशातून मालाची आयात पुर्णपणे थांबवली आहे. त्यामुळे आंतरराष्टÑीय बाजारावर देखील त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे भावात देखील घट झाली आहे. ही परिस्थिती सुधारल्यास भविष्यात भाव वाढण्याची शक्यता राहिल. मात्र, सध्या तरी तसे चित्र नाही.-हर्षल नारखेडे, जिनर्स व कापूस बाजाराचे तज्ज्ञसीसीआयने खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, केंद्र बंद करण्याचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, कापूस बाजारात प्रचंड मंदी आहे. जिनर्सकडेही शेतकºयांनी पाठ फिरवली आहे. चीनने निर्यात पुन्हा सुरु केली तर परिस्थिती सुधारू शकेल.-प्रदीप जैन, अध्यक्ष, खान्देश जिनींग असोसिएशन
असाही फटका, ‘कोरोना’मुळे चीनला कापूस निर्यात ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 12:34 PM