बोदवड, जि.जळगाव : सहा लाख रुपयांच्या रकमेच्या अपहारप्रकरणी घाणखेड, ता.बोदवड येथील सरपंच श्रीकांत वसंत वाघोदे व तत्कालिन ग्रामसेवक भास्कर दौलत बागुल यांच्याविरुद्ध बोदवड पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीकांत वसंत वाघोदे व भास्कर दौलत बागुल यांनी यांच्या ताब्यात असलेला शासकीय निधी रुपये पाच लाख ८२ हजार ४४६ तसेच चौदाव्या वित्त आयोगाचा व तात्पुरता पाणीपुरवठ्याचा ग्राम निधी रुपये १९ हजार ५६४ असा एकूण सहा लाख दोन हजार १० रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. ही घटना १ एप्रिल २०१६ ते २५ डिसेंम्बर २०१६ या कालावधीत घडल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे. त्यानुसार बोदवड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रवींद्र सपकाळे यांनी बोदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भा.दं.वि. कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश भामरे करीत आहे.
बोदवड तालुक्यातील घाणखेडे ग्रामपंचायतीत अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 9:26 PM
सहा लाख रुपयांच्या रकमेच्या अपहारप्रकरणी घाणखेड, ता.बोदवड येथील सरपंच श्रीकांत वसंत वाघोदे व तत्कालिन ग्रामसेवक भास्कर दौलत बागुल यांच्याविरुद्ध बोदवड पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देघाणखेड्याच्या सरपंचाची दिवाळी अंधारातएप्रिल ते डिसेंबर २०१६ दरम्यानची घटना