शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:15 AM

आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे ऑनलाईन भीम महोत्सव साजरा करण्‍यात आला. या महोत्सवात काव्य, सजावट, वक्तृत्व, आदी स्पर्धा घेण्‍यात ...

आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे ऑनलाईन भीम महोत्सव साजरा करण्‍यात आला. या महोत्सवात काव्य, सजावट, वक्तृत्व, आदी स्पर्धा घेण्‍यात आल्या. त्यामध्ये १४२ स्पर्धेकांनी सहभाग घेतला. या भीम महोत्सवाचे उद्घाटन भरत अमळकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. त्याचबरोबर प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद भालेराव यांच्या निवासस्थानी शिवाजी नगर येथे सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शरद भालेराव, दीपक जोशी, विलास यशवंते, हरिश्चंद्र सोनवणे, विठ्ठल भालेराव, कुलदीप भालेराव, प्रबुद्ध भालेराव, आदी उपस्थित होते.

==========================

मानवसेवा विद्यालय

मानवसेवा विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका माया आंबटकर, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, शिशू मुख्याध्यापिका मुक्ता पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच ऑनलाईन पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी गीत सादर केले. आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेण्यात आली.

========================

महाराणा प्रताप विद्यालय

महाराणा प्रताप माध्‍यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ऑनलाईन पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका साधना शर्मा यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली. बारावीच्या विद्यार्थ्यांनी संविधान वाचन केले. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी भीमगिते सादर केली. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग घेतला.

=======================

निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान (फोटो)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या कार्यक्रमाला प्रभुदास जावळे, प्रल्हाद जावळे, किरण जावळे, सतीश जावळे, लालदास गोयर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कारप्राप्त अविनाश जावळे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल माहिती दिली. हर्षाली ढिलोर, पृथ्वी सोनवाल, शगुन सोनवाल, स्वामी गोयर, सीखा गोयर, निहाल गोयर, हिमांशी गोयर, जान्हवी सोनवाल, मोहित जावळे, नेहा तेजी, खुशी तेजी, नंदिनी पवार, राज तेजी, देवेंद्र जावळे, पायल सोनवाल, नंदिनी तेजी, युवराज जावळे, आदी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्‍यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमोद जावळे, धीरज जावळे, सागर गोयर, राकेश गोयर, आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अविनाश जावळे यांनी केले.

=======================

नूतन मराठा विद्यालय (फोटो)

नूतन मराठा विद्यालय येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्‍यात आले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक अे. पी. सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्‍यात आले. यावेळी एस. व्ही. मराठे, डी. एस. सोनवणे, ए. बी. चौधरी, एम. बी. मोरे, एम. पी. पाटील, पी. आय. परदेशी, एन. एस. लेंडाईत, एस. एस. संदानशिव, पी. व्ही. वाडे, बी. व्ही. देशमुख, आदी उपस्थित होते.

==========================

मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्या. कार्यालय (फोटो)

जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादीत संस्थेच्या मुख्य कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे, ज. जि. मविप्रचे संचालक ॲड. विजय भास्करराव पाटील, माजी नगरसेवक सुनील माळी, सचिन धांडे, देविदास ठाकरे, अमोल कोल्हे, एस. एन. पाटील, आदी उपस्थित होते.